कानपूर - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये नरौरा गावात पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे पतीने प्रियकर आणि स्वत:च्या पत्नीला संपवल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नर्वल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचे समजताच पती राजेश कुमार कुरील यांचा राग अनावर झाला. त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध शेजारी असलेल्या गावातील मनीष नावाच्या तरुणासोबत असल्याची कबूली आरोपी राजेशने दिली आहे. या कारणावरून दोघांमध्ये रोज भांडणं होत होती. मात्र, पतीचं पत्नी ऐकण्यास तयार नसल्याने आरोपी पती राजेशचा राग अनावर झाला आणि त्याने धारदार शस्त्रानं गळा चिरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. माझ्या पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. मला अटक करा अशी स्वत: आरोपीने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आहे.
अनैतिक संबंधातून पतीने संपवले पत्नीसह तिच्या प्रियकराला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 18:12 IST
नर्वल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली.
अनैतिक संबंधातून पतीने संपवले पत्नीसह तिच्या प्रियकराला
ठळक मुद्देनरौरा गावात पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे पतीने प्रियकर आणि स्वत:च्या पत्नीला संपवल्यानं परिसरात एकच खळबळमला अटक करा अशी स्वत: आरोपीने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आहे.