शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नवऱ्याचा काटा काढून प्रियकरासोबत पळाली बायको, पतीचा 'तो' Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 19:50 IST

भाग सिंह हे मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

राजस्थानमधील भरतपूर येथे एका महिलेने पतीला विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर ती मुलांसह प्रियकरासोबत पळून गेली. यामध्ये महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे, पण मृत्यूपूर्वी त्याने व्हिडीओ बनवला आणि संपूर्ण घटना सांगितली. हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार गुरुवारी घडला. भरतपूरच्या बयाना पोलीस स्टेशन हद्दीतील सिकंदरा गावात राहणारा 35 वर्षीय भाग सिंह पत्नी आणि तीन मुलांसह नादबाई शहरात राहत होता. भाग सिंह हा मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. भाग सिंह याची पत्नी आरती देवी हिचे शेजारी राहणाऱ्या एका नातेवाईकासोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब भाग सिंहला समजताच दोघांमध्ये भांडण सुरू झालं.

भाग सिंहची प्रकृती खालावल्याने त्यांना नादबाई येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर केले, मात्र रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले जात असताना त्याने त्याच्या विधानाचा एक व्हिडीओ बनवला, जो आता खूप व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भाग सिंह याने माझ्या पत्नीचे एका पुरुषासोबत संबंध असल्याचं म्हटलं आहे. माझ्या पत्नीने मला मारहाण केली आणि जेवणात विष दिलं. ती तिच्या प्रियकरासह पळून गेली असल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ भाग सिंह याच्या मृत्यूच्या काही तास आधीचा आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. 

भाग सिंह याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला तीन मुलं आहेत. भाग सिंह ज्या भाड्याच्या घरात राहत होते, त्या घरात नातेवाईक येत होता, ज्याच्यासोबत भाग सिंह यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते, असा आरोप आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याआधारे तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी