शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीच्या शरीराचे तुकडे करून विल्हेवाट लावत होती पत्नी, तेव्हाच झाला धमाका आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:19 IST

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅटच्या आत मृतदेहाचे तुकडे पाहून ते हैराण झाले. पोलिसांनी तुकडे पोस्टमार्टमसाठी पाठवले.

पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. पण बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या. आरोप आहे की, महिलेने आपल्या प्रियकरासोबत आणि बहीण व भाओजीसोबत मिळून आधी पतीची हत्या केली. नंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्यावर केमिकल टाकून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

इथे ३० वर्षीय राकेशच्या हत्येचा आऱोप त्याची पत्नी राधा, प्रियकर सुभाष आणि बहीण व भाओजीवर आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेचा प्रियकर सुभाषने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये मृतदेहाचे अनेक तुकडे केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी केमिकलचा वापर केला. पण तेव्हाच मोठा धमाका झाला. ज्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सूचना दिली. (हे पण वाचा : खुलासा! डॉक्टरची पत्नी आणि जिम ट्रेनरमध्ये काय होतं नातं? ११०० झालं होतं बोलणं...)

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅटच्या आत मृतदेहाचे तुकडे पाहून ते हैराण झाले. पोलिसांनी तुकडे पोस्टमार्टमसाठी पाठवले आणि प्रकरणाची फॉरेन्सिक टीमकडून चौकशी सुरू केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. मृत  राकेश हा बिहारमध्ये दारूबंदीनंतरही बेकायदेशीरपणे दारूचा धंदा करत होता. त्यामुळे तोही पोलिसांच्या रडारवर होता. त्यामुळे तो जास्तीत जास्त काळ लपून राहत होता. 

यादरम्यान राकेशचा साथीदार सुभाष त्याच्या पत्नीची देखरेख करत होता. काही दिवसांनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर महिला राधाने प्रियकरासोबत मिळून पतीला मारण्याचा प्लॅन केला. ज्यात तिची बहीण आणि भाओजीही सामिल होते. राधाने पतीला घरी बोलवलं आणि प्रियकर सुभाषसोबत मिळून त्याची हत्या केली. (हे पण वाचा : अशीही फसवणूक! पत्नी लाखो रूपये घेऊन परदेशात गेली, पतीचा फोन उचलणंही केलं बंद...)

राकेशच्या हत्येनंतर त्याचा भाऊ दिनेशने पोलीस स्टेशनमध्ये राकेशची पत्नी राधा देवी, तिचा प्रियकर सुभाष, बहीण कृष्णा आणि तिचा पती यांच्यावर हत्येचा आरोप लावत तक्रार दिली. मृतकाचा भाऊ दिनेश म्हणाला की, त्याच्या मोठ्या भावाचा सहयोगी सुभाषसोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. राकेशच्या भावाने आरोप लावला की, त्याच्या भावाच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत सर्वांनाच माहिती होती. दिनेशने सांगितल्याप्रमाणे राकेश काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी परतला होता आणि भाड्याच्या घरात राहत होता.

दिनेशने सांगितलं की, शनिवारी त्या घरात अचानक धमाका झाला. तिथे जाऊन पाहिलं तर समजलं की, माझ्या भावाची हत्या करण्यात आणि मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचं कारण मृतकाच्या पत्नीचे सुभाष नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी