शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

ती रडायची अन् तो हसायचा! लग्नानंतर पती झाला हैवान; गरम चिमट्याने दिले चटके, केला छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 14:22 IST

पतीने आपली पत्नी चेटकीण असल्याचं सांगून तिला गरम चिमट्याने चटके दिल्याची भयंकर घटना घडली आहे.

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीने आपली पत्नी चेटकीण असल्याचं सांगून तिला गरम चिमट्याने चटके दिल्याची भयंकर घटना घडली आहे. पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये चालवल्या जाणार्‍या महिला सुरक्षा आणि समुपदेशन केंद्रात पोहोचली आणि तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत माहिती दिली. तिने पतीपासून तिला वाचवण्याची विनंती केली. पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या छळाला कंटाळून 28 वर्षीय महिला तिच्या गावी आली. तिथे तिने सरपंच बंशीधर यांना आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर सरपंच बंशीधर यांनी पीडितेला चुरू महिला पोलिस स्टेशनमध्ये चालवण्यात येणाऱ्या महिला सुरक्षा केंद्रात पाठवले. येथे महिलेने सांगितले की, 11 वर्षांपूर्वी तिचे लग्न सुजानगड तहसीलमधील गोपालपुरा गावात राहणाऱ्या शेरारामसोबत झालं होतं. तिच्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे.

दारू पिऊन पती पैशाची मागणी करतो, असा पीडितेचा आरोप आहे. भांडणही करतो, मारहाण करतो. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीने तिला चेटकीण म्हटले आणि गरम चिमट्याने तिच्या अंगावर चटके दिले. 11 जून रोजीही आरोपी पतीने दारू पिऊन मारहाण केली. नंतर ती भूत असल्याचं सांगून तिच्या पाठीवर गरम चिमट्याने चटका दिला.

महिलेने सांगितले की, ती ओरडत राहिली पण तिच्या पतीवर काहीही परिणाम झाला नाही. ती रडत असताना तो हसत होता. त्यानंतर पतीने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तिने आपल्या बहिणीला हा प्रकार सांगितला. बहिणीने तिला गावचे सरपंच बंशीधर यांच्याकडे नेले. सरपंचाने दोघींनाही महिला पोलीस ठाण्यात चालवल्या जाणाऱ्या महिला सुरक्षा व समुपदेशन केंद्रात नेले. पतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी