शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करून उत्तर प्रदेशात पळण्याच्या तयारीत असलेल्या पतीस अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 21:24 IST

मृत अज्ञात महिलेच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने प्रहार करून तिची हत्या केल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देकक्ष ६ ने गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, देवनार आणि ट्रॉम्बे या परिसरात ५ वेगवेगळी पथके रवाना करून जलद गतीने तपास केला. मृत महिलेचा पती उत्तर प्रदेशातील मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस त्याच्या मुसक्या आवळल्या.

मुंबई - ५ सप्टेंबरला सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास सायन - ट्रॉम्बे रोडवर २० ते २५ वयोगटातील अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाकडून मानखुर्द पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा कक्ष ६ ने अधिक तपास सुरु केले. त्यानंतर राजावाडी रुग्णालयात भेट देणाऱ्या पथकाने केलेल्या चौकशीत मृत अज्ञात महिलेच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने प्रहार करून तिची हत्या केल्याचे निदर्शनास आले. मृतदेहाजवळ मृत महिलेची ओळख पटविणारी काहीही वस्तू देखील पोलिसांना साडपलेली नव्हती. त्यानंतर कक्ष ६ ने गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, देवनार आणि ट्रॉम्बे या परिसरात ५ वेगवेगळी पथके रवाना करून जलद गतीने तपास केला. शिवाजी नगर परिसरात तपास करत असताना एका पथकातील पोलीस हवालदार मनोहर भोसले यांच्या त्या परिसरातील गोपनीय सूत्रांकडून आणि तांत्रिक तपासात मृत महिलेचे नाव नूर बेगम असून तिचे तिच्या पतीशी भांडण होत असल्याची माहिती मिळाली. मृत महिलेचा पती उत्तर प्रदेशातील मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर हत्येची उकल झाली. ४ सप्टेंबरला नूरचे पतीसोबत कडाक्याचे भांडण झाल्याने रात्री १० ते १०. ३० वाजताच्या सुमारास रागाच्या भरात सायन - ट्रॉम्बे रोडवर नूरच्या डोक्यावर दोनवेळा जड दगडाने प्रहार करून तिची हत्या केल्याचे अटक पतीने कबुली दिली. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक