ग्रामपंचायत निवडणूक वादातून चौघांकडून पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण
By रोहित टेके | Updated: February 28, 2023 09:20 IST2023-02-28T09:19:59+5:302023-02-28T09:20:20+5:30
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात घडली घटना

ग्रामपंचायत निवडणूक वादातून चौघांकडून पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण
कोपरगाव - दोन महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहिल्याच्या रागातून चौघांनी मिळून पती-पत्नीस शिवागाळ करुन लाकडी दांड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले आहे. त्याचसोबत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. शाईन फैय्याज सैय्यद व फैय्याज सैय्यद ( दोघे रा. डाऊच खुर्द ता.कोपरगाव ) अशी मारहाण झालेल्या पती-पत्नीचे नाव आहेत.
या प्रकरणी जखमी शाईन सैय्यद या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याच्या जबाबावरून सोमवारी (दि.२७) रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मुन्ना सिकंदर सैय्यद, साजिद हसन शेख, समीर मुन्ना सय्यद, युनुस सिकंदर सैय्यद ( सर्व रा. डाऊच खुर्द ता. कोपरगाव ) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल के. ए. जाधव करीत आहेत.