शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा ‘हंटर’, गांजा तस्करीत सहभागी कॉन्स्टेबल बडतर्फ

By योगेश पांडे | Updated: May 13, 2024 21:58 IST

रेल्वेत महिला पोलिसाशी छेडछाड करणारे दोघे कर्मचारी निलंबित

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी गांजा तस्करीत सहभागी असलेल्या एका हवालदाराला बडतर्फ केले आहे तर सहकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित केले आहे. यापुढे अवैध कामांत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लगेच कठोर कारवाई करण्याचा इशारा यातून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रोशन उगले असे गांजा तस्करीत सहभागी असलेल्या हवालदाराचे नाव आहे. तर युवराज राठोड व आदित्य यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. रोशन उगले याला २०२१ मध्ये पत्नीसह ओरिसा येथून गांजाची खेप आणताना रंगेहाथ पकडण्यात आले होते व एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रोशनला निलंबित करण्यात आले होते. विभागीय चौकशीही करण्यात आली. तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही रोशनवर कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी तातडीने कारवाई केली व त्याला नोकरीतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी करण्यात आला.

तर युवराज राठोड व आदित्य यादव यांनी पुणे जिल्ह्यात निवडणूक ड्युटीसाठी पाठविण्यात आले होते. विविध पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष कर्मचारी रेल्वेने पुण्याला जात होते. यावेळी दोघांनी मद्य प्राशन केले व बोगीत गोंधळ घातला. नशेत त्यांनी सहकारी महिला कर्मचाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ सुरू केली. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवला. पीडित महिला कर्मचाऱ्याने जीआरपीकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली. हे प्रकरण तापताच दोन्ही जवानांना नागपूरला बोलावण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.सिंगल यांनी दोघांनाही निलंबित केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर