शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून १९ तरुणांना गंडा, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 03:07 IST

मुंबईसह राज्यभरातील १९ तरुण-तरुणींना भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टरपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ७ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

मुंबई  - मुंबईसह राज्यभरातील १९ तरुण-तरुणींना भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टरपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ७ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ठगांनी बनावट प्रमाणपत्रासह रेल्वेचे बनावट संकेतस्थळ तयार करत यावर संबंधित तरुणांची नावे प्रसिद्ध करून त्यांचा विश्वास संपादन केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेचे कक्ष ११ अधिक तपास करत आहेत.ऐरोली येथील रहिवासी असलेले सखाराम लांडगे (३७) यांच्या तक्रारीवरून या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लांडगे यांच्या तक्रारीनुसार, २०१६ पासून वाराणसी, कोलकाता या ठिकाणी लांडगे यांच्यासह १८ उमेदवारांना तसेच बाहेरील राज्यांतील मुलांनाही राजेशकुमार, मनिष सिंग, संजीव रॉय व सीमा पवार तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी भारतीय रेल्वेत टिकीट कलेक्टर या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून ७ लाख रुपये उकळले. आरटीजीएसमार्फत हे पैसे त्यानेस्वीकारले.या तरुणांना भारतीय रेल्वेचा लोगो असलेली बनावट अपॉइंटमेंट पत्र, बनावट पोस्टिंग लेटर, बनावट पेमेंट स्लिप, बनावट आयडी कार्ड देऊन, तसेच भारतीय रेल्वेच्या तयार केलेल्या बनावट संकेतस्थळावरून तक्रारदार व इतरांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे या तरुणांचा आरोपींवर विश्वास बसला. नोकरीची स्वप्ने रंगविण्यास सुरुवात केली असताना आरोपी नॉट रिचेबल झाले. त्यांनी दिलेली कागदपत्रेही खोटी निघाली. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अधिक तपास सुरू आहे.मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यताराज्यभरात शेकडो तरुणांची फसवणूक झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, आरोपी जाळ्यात आल्यानंतर मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndian Railwayभारतीय रेल्वे