शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीची माणूसकी; रस्त्यावर तडफडणार्‍या वृद्धाचे वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 20:51 IST

कित्येक दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे कृश-अशक्त झालेले शरीर पाहून या चार शिलेदारांनी त्यांना ताबडतोब विरारच्या  महापालिका रुग्णालयात दाखल केले. 

ठळक मुद्दे खुद्द पोलीसांनीच आपल्याला मदतीचा हात दिला, हे पाहून त्यांना धीर आला. पोलीसांनीही संधी साधून त्यांना बोलते केले.

नालासोपारा - भर उन्हात रस्त्यात तडफडणार्‍या एका 75 वर्षीय वृद्धाचे प्राण वाचवून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील चार पोलीसांनी खाकी वर्दीतील माणूसकी दाखवून दिली आहे.विरार पूर्वेकडील अर्नाळा रोडवरील ओलांडा रस्त्याच्या कडेला एका वृद्ध भर उन्हात तडफडत असलेला पोलीस नाईक एल. डी. चंदनशिवे, निलेश गुजर, लेंगरे, कोळेकर यांना दिसून आला. त्यांनी लागलीच सदर वृद्धाला आधार देवून त्याची विचारपूस केली. मात्र, आधार हरवल्यामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली होती, धड बोलताही येत नव्हते. या पोलीसांनी त्यांना लागलीच पाणी आणि ज्युस पाजले. त्यामुळे त्यांच्या जीवात जीव आला. कित्येक दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे कृश-अशक्त झालेले शरीर पाहून या चार शिलेदारांनी त्यांना ताबडतोब विरारच्या  महापालिका रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर हायसे वाटले. खुद्द पोलीसांनीच आपल्याला मदतीचा हात दिला, हे पाहून त्यांना धीर आला. पोलीसांनीही संधी साधून त्यांना बोलते केले. त्यावेळी इक्बाल अहमद शेख असे त्यांनी स्वतःचे नाव सांगितले. तसेच फक्त ब असा आपल्या गावाचा उल्लेख केला.  त्यामुळे आम्ही अनुभवाने बीड पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर 5 मे पासून शेख बेपत्ता असल्याची तक्रार सदर पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे समजले. या ठाण्यातून शेख यांच्या मुंबई येथील नातेवाईकांचा पत्ता माहित केला. त्यानंतर खार येथून त्यांच्या नातेवाईकांना बोलवून शेख यांना ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीस निरिक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVirarविरारhospitalहॉस्पिटल