शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अंबाझरी ले-आऊटमध्ये आढळले हुक्का पार्लर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:29 IST

गुन्हे शाखा पोलिसांनी अंबाझरी ले-आऊटमध्ये दिवसाढवळ्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे.

ठळक मुद्देसंचालकात खळबळ : पाच दिवसात सामाजिक सुरक्षा शाखेची दुसरी कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी अंबाझरी ले-आऊटमध्ये दिवसाढवळ्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. पोलिसांना हॉटेल तनवीरजवळील मिम्स हुक्का पार्लरमध्ये  हुक्का दिल्या जात असल्याची माहिती मिळाली. दुपारची वेळ असल्यामुळे पोलिसांना विद्यार्थी सापडतील असा विश्वास होता. परंतु आत प्रवेश केल्यानंतर ग्राहक मिळाले नाहीत. पार्लरची तपासणी केली असता तंबाखू फ्लेवरचा हुक्का सापडला.कारवाईत पोलिसांनी हुक्क्याच्या सामानासह ७५८० रुपयांचे साहित्य जप्त केले. तेथे पार्लरचा व्यवस्थापक भरत रमेश नागोसे रा. पांढराबोडी हा होता. त्याने पार्लरचा मालक मोहसीन खान असल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहसीन अनेक दिवसांपासून हुक्का पार्लर चालवितो. त्याने पोलिसांच्या विरुद्ध न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे त्याच्या पार्लरवर कारवाईची हिंमत कुणी करीत नव्हते. सामाजिक सुरक्षा शाखेने योजना आखून हुक्का पार्लरवर धाड टाकली. अंबाझरी आणि बजाजनगर ठाण्याच्या परिसरात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. येथे हर्बलच्या आड प्रतिबंधित हुक्का दिला जातो. त्यांना पोलिसांचा आश्रय आहे. हुक्का पार्लरबाबत अंबाझरी, सीताबर्डी, सदर सर्वाधिक चर्चेत आहे. येथे रात्री उशिरापर्यंत हुक्का पार्लर सुरु राहतात. माऊंट रोडवरील एक हुक्का पार्लर पहाटेपर्यंत सुरु असते. येथे तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना दिसतात. परंतु पोलीस कारवाई करीत नाहीत. २५ जानेवारीला रात्री अंबाझरीच्या शंकरनगर चौकाजवळ वाईब्स कॅफे आणि रेस्ट्रोत धाड टाकण्यात आली. १५ पेक्षा अधिक युवक-युवती हुक्का पिताना आढळल्या. पोलिसांनी व्यवस्थापक अमित इंगळे, मालक शब्बीर बलाकत शेख, पप्पु डागोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. २०१७ पासून हे हुक्का पार्लर चालविण्यात येते. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यावरही अंबाझरी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी कारवाई करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक सुरक्षा शाखेशी संपर्क साधून कारवाई करण्याची मागणी केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर पार्वते, अतुल इंगोले, सुभाष खेडकर, मनोज सिंह चव्हाण, प्रवीण फांदडे, मुकुंदा घारमोडे, प्रफुल बोंदरे, दीपिका दानोडे, सीमा बघेल यांनी केली.

टॅग्स :Policeपोलिसraidधाड