शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर ‘हिट अँड रन’; कॉन्स्टेबल जखमी, पीएसआय थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 06:06 IST

पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री वरळी सी लिंकवर अपघात झाल्याचा फोन वांद्रे पोलिसांना आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे-वरळी सी लिंक येथे शनिवारी रात्री ऑडी गाडीने दिलेल्या धडकेत वांद्रे पोलिस ठाण्याशी संलग्न असलेले हवालदार बंकट नवगिरे गंभीर जखमी झाले, तर पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग पोकळे थोडक्यात बचावले. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल सुरू केला आहे. 

पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री वरळी सी लिंकवर अपघात झाल्याचा फोन वांद्रे पोलिसांना आला होता. त्यानुसार, पोकळे आणि नवगिरे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, नवगिरे आणि पोकळे हे घटनास्थळी पंचनामा करत होते. त्यावेळी अचानक भरधाव वेगाने एक कार झिगझॅग करत पोकळेंच्या दिशेने आली. तेव्हा त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी टोल प्लाजाच्या दिशेने धाव घेतली, तर नवगिरे हे रस्त्याच्या बाजूने धावले. मात्र, कार उजव्या दिशेने येत असल्याने नवगिरेना तिची जोरदार धडक बसली. ज्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. 

घटनास्थळावरून कारचालक पळालाअपघातानंतर ऑडी कारच्या चालकाने आपले वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर, पांडुरंग पोकळे यांनी तातडीने बंकट नवगिरेना वांद्रेच्या भाभा रुग्णालयात हलविले. तिथे नवगिरे यांच्या डाव्या हाताचे हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरने सांगितले. उपचारानंतर नवगिरे यांना घरी सोडण्यात आले. ही संपूर्ण घटना सी लिंकवरील टोल प्लाझा कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ऑडीचालकाचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :Policeपोलिस