शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Hinganghat Verdict Chitra Wagh: "ही माणसं नाहीत, हे तर हैवान! अशा नराधमांना फासावरच लटकवायला हवं"; भाजपाच्या चित्रा वाघ यांची जळजळीत प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:43 IST

हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावली जन्मठेप

Hinganghat Verdict: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून मारण्याची दुर्घटना दोन वर्षांपूर्वी घडली. या प्रकरणातला आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याने आज न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अंतिम सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाची बाजू मांडताना अ‍ॅड. उज्जवल निकम यांनी कोर्टात अनेक दाखले दिले. अतिशय क्रूर मनोवृत्तीने घडलेल्या या जळीतप्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. अशा प्रकरणातील आरोपी हे हैवानच असल्याची भावना व्यक्त करत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विकी नगराळेला फासावरच लटकवायला हवं होतं, अशी भूमिका मांडली.

"हिंगणघाटच्या निर्भयाला जाळून मारणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा झालीये. खरं तर अशा नराधमांना फासावरच लटकवायला हवंय…. ही माणसं नाहीतच, हे तर हैवान आहेत. न्यायालयाचा निकाल आला परंतु शासनाने या परिवाराला दिलेल्या लेखी आश्वासनांची पुर्तता अद्याप केलेली नाही हे दुदैवी आहे", असं ट्वीट त्यांनी केलं. चित्रा वाघ यांनी सोबत आपलं मत सविस्तर मांडणारा एक व्हिडीओही पोस्ट केला केला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी शासनाकडे अशी मागणी केली की या आरोपीला फासावर लटकवण्यासाठी आता राज्य सरकारनेच पावलं उचलायला हवीत.

दरम्यान, हिंगणघाट जळीतप्रकरणाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणातील आरोपीचा  गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी बुधावारी स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केंद्रस्थानी ठेवत आरोपीच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यावर गुरुवारी निकाल जाहीर केला जाईल असं अ‍ॅड. उज्जवल निकम यांनी सांगितलं होतं. त्यानुसार या प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या संपूर्ण सुनावणीच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हिंगणघाटमधील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर प्राध्यापिका नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात होती. त्यावेळी आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी पीडितेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना १० फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले होते.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटCourtन्यायालयChitra Waghचित्रा वाघCrime Newsगुन्हेगारी