शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तुला आई कसं म्हणू... पोटच्या मुलीचा गळा कापणाऱ्या उच्चशिक्षित आईला अटक

By नामदेव भोर | Updated: March 22, 2023 16:06 IST

ध्रुवांशीवर चालवला भाजी कापण्याचा चाकू : पोलिस घेणार मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला

नामदेव भोर /नाशिक 

नाशिक : अवघी तीन महिन्यांची मुलगी तिच्या वडिलांसारखी दिसते. ती माझ्याशी हसत नाही, सारखीच आजी व वडिलांकडे राहते, त्यामुळे सासरच्यांकडून मारले जाणारे टोमणे यातून पोटच्याच मुलीविषयी द्वेषभावना निर्माण होऊन उच्चशिक्षित संशयित युक्ता भूषण रोकडे हिने तिची मुलगी ध्रुवांशी भूषण रोकडे हिची घरातील भाजी कापण्याच्या चाकूने हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी युक्ताला अटक केली आहे. दरम्यान, उच्चशिक्षित युक्ताने अशाप्रकारचे विकृत कृत्य करून मायलेकीच्या नात्याला काळीमा फासल्याने या प्रकरणात पोलिस मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेणार आहेत.

रसायनशास्त्रातील पदवीधर असलेल्या संशयित युक्ता रोकडे हिने तिची मुलगी ध्रुवांशी ही वडील आणि आजीकडे पाहून हसते, जास्त वेळ त्यांच्याकडेच राहते, याचा राग येऊन ध्रुवांशीचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युक्ता भूषण राेकडे (२६, रा. फ्लॅट नं १, ध्रुवनगर गंगापूर शिवार, नाशिक) हिने तिची तीन महिन्यांची मुलगी ध्रुवांशी घरात खेळत असताना किचनमधील चाकूने तिचा सपासप गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तिने चाकूचे रक्त व्यवस्थित धुवून चाकू पुन्हा किचनमध्ये ठेवून देत बेशुद्ध झाल्याचा बनाव केला. मात्र, तिचे कुटुंबीय घरात आल्यानंतर त्यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती लगेच उठल्याने तसेच तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला होता. त्यामुळे युक्तासह सर्वच नातलगांची चाैकशी झाल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस