शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; आयपीएस पुरुषोत्तम शर्मा निलंबित

By हेमंत बावकर | Updated: September 28, 2020 15:06 IST

स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा पुन्हा एका मोठ्या वादात सापडले आहेत. आयपीएस पुरुषोत्तम शर्मा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते त्यांच्य़ा पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे शर्मा यांना प्रेय़सीसोबत त्यांच्या पत्नीने रंगेहाथ पकडल्याने ही मारहाण केल्य़ाचे कबूल केले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशचे विशेष पोलीस संचालक पुरुषोत्तम शर्मा पत्नीच्या मारहाणीनंतर आणखी एक व्हिडीओ व्हारल झाला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या पत्नीने शर्मांच्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅटवर बनविला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच शर्मा पत्नीवर भडकले होते. यानंतर शर्मा यांच्यावर सरकारने कारवाई केली असून त्यांना एडीजी पदावरून हटविण्यात आले आहे. 

या व्हिडीओवर शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले असून मी जिथे जिथे जात असे पत्नी माझ्या मागे येत होती, असा आरोप केला आहे. पत्नीला मारहाण करण्यासाठी हाच आताचा व्हिडीओ कारणीभूत होता. यानंतर या मारहाणीचाही व्हिडीओ बनवून तो त्यांच्याच आयआरएस अधिकारी असलेल्या मुलाने मुख्यमंत्री, गृहमंत्री ते मोठमोठे पोलीस अधिकाऱ्यांना पाठविला होता. यावर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यावर सांगितले होते की, माझ्याकडे अद्याप कोणतीही लिखित तक्रार आलेली नाही. मी मीडियामध्येच याबाबतच्या बातम्या पाहिल्या आहेत. जेव्हा लिखित तक्रार येईल त्यानंतर कारवाई केली जाईल. यानंतर शर्मायांच्यावर कारवाई करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, जो कायदा हातात घेईल त्याला सोडले जाणार नाही. 

मारहाणीच्या व्हिडीओनंतर शर्मा यांनी स्पष्टीकरण देताना मी कोणताही गुन्हा केलेला नाही. हा माझा कौटुंबिक प्रश्न आहे. ती जर माझ्यावर नाराज असेल तर माझ्यासोबत का राहत आहे. माझ्या पैशांचा वापर करते, परदेशात फिरायला जाते. या प्रश्नाला मी स्वत: सोडवेन. सेल्फ डिफेन्समध्ये माझ्याकडून केवळ झटापट झाली आहे. आता पत्नी आणि मुलगाच हा व्हिडीओ व्हायरल का केला ते सांगू शकतील. 

खरेतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये शर्मा एका महिला मैत्रिणीसोबत एका घरात बसलेले आहेत. तेव्हाच त्यांची पत्नी तिथे पोहोचते. तिला पाहून डीजी पुरुषोत्तम शर्मा तेथून उठतात आणि जातात. तिथे ते म्हणतात कोणाला भेटणे गुन्हा आहे का? जर मी या महिलेसोबत काही केले असेन तर तिने माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा. शर्मा तिथून गेल्यावर त्यांची पत्नी त्या महिलेची चौकशी करते. 

 

बेडरुम दाखव शर्मा यांच्या पत्नीला संशय होता की ते दोघे आतमध्ये काहीतरी चुकीचे करत होते. कारण दरवाजा उघडायला दोघांना वेळ लागला होता. यामुळे त्यांनी त्या महिलेला बेडरूम दाखविण्यास सांगितले. त्या महिलेने तिला बेडरुपमपर्यंत नेले आणि तिला विचारले की त्यांच्यासोबत हैदराबादला गेली होतीस का? यावर तिने नाही असे सांगितले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस