शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सच्या बदल्यात कॉलेजमधले प्रोफेसर देत होते चांगले मार्क, अशी उघड झाली हायप्रोफाईल केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 19:04 IST

Sex Crime : हसन युनिव्हर्सिटीशी संबंधित ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील चॅट सोशल मीडियावर लीक झाले. यानंतर देशभरात खळबळ उडाली.

राबत : चांगल्या गुणांच्या बदल्यात विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्राध्यापकाची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या हायप्रोफाईल प्रकरणात अजून ४ प्राध्यापकांनान्यायालयात हजर राहायचं आहे. आफ्रिकन देशातील मोरोक्को येथील न्यायालयाने एका प्राध्यापकाला असभ्य वर्तन, लैंगिक छळ आणि हिंसाचार याप्रकरणी दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हसन युनिव्हर्सिटीशी संबंधित ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील चॅट सोशल मीडियावर लीक झाले. यानंतर देशभरात खळबळ उडाली.५ प्राध्यापकांची नावे झाली उघड बीबीसीच्या अहवालानुसार, मोरोक्कोमधील विद्यापीठांमध्ये हाय प्रोफाइल लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हा पहिला निर्णय आहे. हसन I विद्यापीठाच्या (Hassan I University) अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला आपल्या विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. प्राध्यापक विद्यार्थिनींना चांगले गुण देण्याच्या बहाण्याने लैंगिक त्रास देत असे. या प्रकरणी अजून ४ प्राध्यापक न्यायालयात हजर राहिले आहेत. चांगल्या गुणांच्या बदल्यात मुलींना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप विद्यापीठातील एकूण पाच प्राध्यापकांवर आहे.

मुलीने चॅट लीक केले होतेगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील चॅट सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. वास्तविक, विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने हे चॅट  सार्वजनिक केले होते. हळूहळू हे प्रकरण पसरले आणि हे चॅट विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचले. यानंतर प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरण न्यायालयात पोहोचले. या खुलाशानंतर देशभरात खळबळ उडाली असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत.मोरोक्कन विद्यापीठाची वाईट प्रतिमादरम्यान, अन्य काही विद्यार्थिनींनीही असाच आरोप केल्यावर विद्यापीठातील इतर प्राध्यापकांचीही नावे समोर आली आहेत. एकूण पाच प्राध्यापकांना आरोपी करून पाचही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी आता एकाला असभ्य वर्तन, लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. अहवालानुसार, अलिकडच्या वर्षांत मोरोक्कन विद्यापीठाच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल अशा घटना एकामागून एक घडत आहेत. तथापि, सध्याचे प्रकरण वेगळे होते कारण ते प्रथमच न्यायालयात गेले.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसProfessorप्राध्यापकuniversityविद्यापीठCourtन्यायालय