शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; २८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 21:42 IST

High Court relief to Pratap Saranaik : या याचिकांवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती. 

ठळक मुद्देनॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.(एनएसईएल) आणि टिटवाळा येथील एक जमीन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रताप सरनाईक, त्यांची मुले विहंग व पूर्वेश तसेच त्यांचे निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मुंबई : मनी लॉड्रिंगसह अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्यांची दोन मुले व निकटवर्तीय यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना २८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ईडीला दिले.

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.(एनएसईएल) आणि टिटवाळा येथील एक जमीन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रताप सरनाईक, त्यांची मुले विहंग व पूर्वेश तसेच त्यांचे निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. ईडीच्या या कारवाईला सरनाईक, त्यांची मुले आणि  चंडेला यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती. 

ईडीने बजावलेली समन्स रद्द करण्याची  मागणी या चौघांनीही केली आहे. सरनाईक यांना आणखी एका प्रकरणात अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणांची अंडी जुन्या प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेऊ, असे म्हणत न्यायालयाने या चौघांनाही २८ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालयArrestअटक