मित्रांच्या मदतीने मुलीने स्वत:च्या घरी केली घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:24 IST2020-07-30T00:14:40+5:302020-07-30T00:24:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : मित्रांच्या मदतीने मुलीने स्वत:च्या घरी १३ लाखांची घरफोडी केली. बुधवारी नारपोली पोलिसांनी पत्रकार परिषदेत ...

मित्रांच्या मदतीने मुलीने स्वत:च्या घरी केली घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मित्रांच्या मदतीने मुलीने स्वत:च्या घरी १३ लाखांची घरफोडी केली. बुधवारी नारपोली पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंंगमधील फ्लॅटमध्ये बनावट चावीने दार उघडून घरातील १३ लाख २१ हजाराचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणी घरमालक सुवर्णा सोनगीरकर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी धुळे येथून दोन जणांना अटक केली. मात्र चोरट्यांना अटक केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. सोनगीरकर यांच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीकडे चौकशी केली असता तिच्या बोलण्यातील विसंगती लक्षात आल्यावर तिने आपल्या प्रियकरासोबत कट रचून ही घरफोडी केली. प्रेमविवाह करण्यासाठी तिने हा प्रकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपास पथकाने धुळे येथून प्रतीक तुषार लाळे (माने ) व हेमंत दिलीप सौन्दाणे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ५५ हजार रोख व ८ लाख ९६ हजाराचे दागिने हस्तगत केले आहेत. दरम्यान या घटनेतील मुलीवरही लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुसºया घटनेत ९ जुलै रोजी ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील एलएलपी कंपनीच्या गोदामांचे पत्रे उचकटून ११ लाख ९५ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांनी कामण चिंचोटी येथून आलम मंटू शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ लाख ३४ हजार ६४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना झारखंड येथून ताब्यात घ्यायचे असल्याची माहिती राजकुमार शिंदे यांनी दिली.