शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मन सुन्न करणारी घटना, ५ मजली इमारतीवरून २ मुलींना फेकले खाली, एकीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 19:25 IST

Heartbreaking incident : दुसऱ्या मुलीचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बिहारमधील पाटणा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हे प्रकरण बहादूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एका सनकी तरुणाने दोन मुलींना पाच मजली इमारतीवरून खाली फेकले. यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी रुग्णालयात दाखल आहे. दुसऱ्या मुलीचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.स्थानिक नगरसेवक सतीश कुमार यांनी सांगितले की, नंदलाल गुप्ता यांचे कुटुंब रामकृष्ण कॉलनीत राहते. तो फळांचा व्यवसाय करतो. नंदलाल यांना शालू (वय 10 वर्षे) आणि सलोनी (12 वर्षे) या दोन मुली आहेत. गुरुवारी विवेक कुमार नावाच्या व्यक्तीने दोन्ही मुलींना पाच मजली इमारतीवर नेले आणि तेथून त्यांना फेकून दिले. यानंतर एकाचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाने आरोपीला पकडले. मात्र, दोन्ही मुलींना वरून का फेकून दिले, याचा खुलासा आरोपीने केला नाही.पोलिसांवर दगडफेकघटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी तरुणाला अटक केली. पोलिस आरोपीला घेऊन जात असताना जमावाने पोलिसांवर हल्ला केला. दगडफेकीत पाच पोलिसही जखमी झाले आहेत. वाहनेही जाळण्यात आली. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.आरोपी काहीही सांगत नाहीपोलिसांनी सांगितले की, आरोपीने आतापर्यंत केवळ तो दरभंगा जिल्ह्यातील लहेरियासराय येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. याशिवाय त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याने दोन्ही मुलींना पाचव्या मजल्यावरून खाली का फेकले याचा उलगडाही तो करत नाही. याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक