शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गुगलच्या गुगलीमुळे डॉक्टराला सतराशेचा हेडफोन पडला लाखाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 21:27 IST

सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्दे गुगलच्या गुगलीमुळे सायन रुग्णालयातील डॉक्टराला सतराशे रुपयांचा हेडफोन १ लाख रुपयांना पडला आहे.या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - गुगलच्या गुगलीमुळे सायन रुग्णालयातील डॉक्टराला सतराशे रुपयांचा हेडफोन १ लाख रुपयांना पडला आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसईत राहण्यास असलेले जोसुवा डिसिल्व्हा (२५) हे एमएमबीएस डॉक्टर असून, सायन हॉस्पिटल येथे न्यायवैद्यक शास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांनी २० जून रोजी फ्लीपकार्डवरून १७२९ रुपयांचा हेडफोन मागवला होता. हेडफोनसाठी त्यांनी ऑनलाइन पैसे भरले. सायंकाळी डिलिव्हरी बॉय हेडफोन घेऊन आला. हेडफोनचे पैसे मागितले. मात्र पैसे आॅनलाइन भरल्याने त्यांनी त्याबाबतचा संदेशही दाखवला. परंतु, डिलेव्हरी बॉयने बिलावर ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ असे नमूद असल्याने हेडफोनचे पार्सल दिले नाही. याबाबत फ्लीपकार्डच्या ग्राहक सेवेला कॉल करण्यास सागितले. त्यांनी, गुगलवरून मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्याने, पैसे रिफंड होईल, असे सांगून बँकेच्या डिटेल्स घेतल्या. थोड्या वेळातच त्यांच्या खात्यातून ४९ हजारांचे दोन व्यवहार झाले. त्यानंतर, ४९ हजार रिफंड झाल्याचा संदेश आला. यातच, एकूण १ लाख रुपये काढल्याचे संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकल्याने त्यांचा गोंधळ उडाला. त्यांनी सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसdoctorडॉक्टर