नालासोपारा : सख्ख्या भावाचा खून करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी भावाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त मदन बल्लाळ यांनी शुक्रवारी दिली. योगेश मोहनबहादूर नेपाली (३५) असे मृताचे नाव आहे; तर सूरज मोहनबहादूर नेपाली (३०) असे आरोपी भावाचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलिस निरीक्षक सोपान पाटील, पोलिस उपनिरीक्षक संतोष घाडगे आणि अजित गिते, सहायक फौजदार संजय नवले, मुकेश पवार, रवींद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, हवालदार प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी, राहुल कर्पे, दिलदार शेख, दादा आडके, अनिल साबळे, अक्षय बांगर, मसूब रामेश्वर केकान, तसेच सायबर शाखेचे सहायक फौजदार संतोष चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे.
किरकोळ वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण
१. वसईच्या तुंगार फाटा येथील डॉल्फिन हॉटेल येथे राहणाऱ्या योगेश नेपाली याचा भाऊ सूरज नेपाली याच्यासोबत गुरुवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला. यावरून सूरजने योगेशला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. वर्मी मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
२. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिस पथकाने तपास सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक सोपान पाटील यांना आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीचे मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून मायदेशी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी सूरज मोहनबहादूर नेपाली याला अटक केली आहे.
Web Summary : A man killed his brother near Vasai after a minor dispute. He was arrested by police while attempting to flee to Nepal. The accused had severely beaten the victim, leading to his death. Police investigation led to his capture.
Web Summary : वसई के पास एक व्यक्ति ने मामूली विवाद के बाद अपने भाई की हत्या कर दी। नेपाल भागने की कोशिश करते समय पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया। आरोपी ने पीड़ित को बुरी तरह पीटा, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस जांच के बाद उसे पकड़ा गया।