शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत चोऱ्या करून लावायचा 'तो' लॉटरी  : २.५० लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:15 IST

रेल्वेगाड्यात चोऱ्या करणाऱ्या एका आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. चौकशीत लॉटरी खेळण्याची सवय असल्यामुळे त्याला चोरी करण्याची सवय लागल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने बांधल्या मुसक्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यात चोऱ्या करणाऱ्या एका आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. प्रवाशांचे महागडे मोबाईल, लॅपटॉप चोरून तो विकायचा. अटक केल्यानंतर त्याने रेल्वेत ६ चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख ४७ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत लॉटरी खेळण्याची सवय असल्यामुळे त्याला चोरी करण्याची सवय लागल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.तुलसीदास, रा. गडचांदूर असे आरोपीचे नाव आहे. त्याला पत्नी आणि एक मुलगी आहे. बारावी विज्ञानपर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे. वाईट संगतीमुळे त्याला जुगाराचे व्यसन लागले. कर्ज वाढल्यामुळे त्याने २८ डिसेंबर २०१९ पासून रेल्वेत चोरी करणे सुरु केले. महिनाभरात त्याने ६ चोऱ्या केल्या. गाडीतील टीसीला २०० रुपये देऊन तो एसी डब्यात प्रवास करायचा. बर्थवर ठेवलेला मोबाईल आणि लॅपटॉप उचलून पुढच्या स्थानकावर उतरायचा. चोरीचे साहित्य सहज कोणी घेणार नाही, याची त्याला जाणीव होती. म्हणून तो आपबिती सांगून दोन चार हजारात चोरीच्या वस्तू गहाण ठेवायचा. मिळालेल्या पैशातून पुन्हा लॉटरी खेळायचा. अलीकडेच त्याने नागपुरातील वेकोलि अधिकारी तेजस्वी गुराला यांचा जीटी एक्स्प्रेसमधून लॅपटॉप, दोन मोबाईल आणि रोख १० हजार असा एकून १.१० लाखाचा मुद्देमाल चोरी केला. त्या जीटी एक्स्प्रेसने विजयवाडा ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. गुप्त बातमीदाराकडून तो चोरीच्या वस्तु विकण्यासाठी बल्लारशा रेल्वेस्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचला. तो चहा टपरीवर येताच पोलिसांनी त्यास अटक केली. आतापर्यत त्याने जीटी, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सहायक पोलीस निरीक्षक कविकांत चौधरी, पोलीस हवालदार दीपक डोर्लिकर, पोलीस नायक रवींद्र सावजी, प्रशांत उजवणे, विनोद खोब्रागडे, संदीप लहासे, अमित चौधरी, त्रिवेदी, गौरीश राऊत, चंद्रकांत ठाकूर यांनी केली.

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरीArrestअटक