शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

काम बघा, नंतर पगार ठरवा म्हणाला अन् दागिने घेऊन पळाला

By दत्ता यादव | Updated: February 1, 2023 22:12 IST

पहिल्याच दिवशी त्याने प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. हसन यांचा त्याने विश्वास संपादन केला. पाचव्या दिवशी सकाळी आठ वाजता तो लघुशंका करून येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही.

सातारा : मुंबईहून आलेल्या दागिने बनविणाऱ्या कारागिराने आधी माझं काम बघा, नंतर पगार ठरवा, असे म्हणत सराफाचा विश्वास संपादन केला. यानंतर, पाचव्याच दिवशी त्याने दोन लाखांचे दागिने घेऊन पलायन केले. ही खळबळजनक घटना सातारा शहरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हसन तूरमहंमद शेख (वय ४३, रा. बुधवार पेठ, सातारा) यांचे बुधवार पेठेमध्ये 'एचएस गोल्ड स्मिथ' या नावाचे सोन्याचे दुकान आहे. मुंबईतील एका ओळखीच्या व्यक्तीने पाच दिवसांपूर्वी सराफ व्यावसायिक हसन शेख यांना एक व्यक्ती तुमच्याकडे कामाला पाठवत असून त्याला कामाची गरज आहे, असे सांगितले. त्यानंतर सोफीकूल शेख (वय ३२, पश्चिम बंगाल) हा साताऱ्यात आला. हसन शेख यांच्या दुकानात तो गेला. ओळख झाल्यानंतर त्याने माझं आधी काम बघा. नंतर पगार ठरवा, असं सांगितलं. त्यामुळे हसन यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.

पहिल्याच दिवशी त्याने प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. हसन यांचा त्याने विश्वास संपादन केला. पाचव्या दिवशी सकाळी आठ वाजता तो लघुशंका करून येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही. सराफ व्यावसायिक हसन शेख यांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी दुकानात दागिने पाहिले असता विविध प्रकारचे तब्बल दोन लाखांचे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सोफीकूल शेख याच्यावर गुन्हा दाखल केला. सहायक फाैजदार साबळे हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :GoldसोनंThiefचोरPoliceपोलिस