बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानसोबत भेट करून देण्याच्या आमिषाने पश्चिम बंगालमधील १७ वर्षीय निरागस मुलीला मुंबईत आणणाऱ्या टोळीला दादर लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करत पीडितेची सुटका केली आहे.जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला मानवी तस्करीखाली मुंबईत आणले होते. शाहरुखच्या वांद्रे येथील बंगल्यात भेटेल, असे पीडित मुलीला सांगण्यात आले. मुलगी आरोपीच्या बतावणीत फसली आणि ती मुंबईत आली. इयत्ता १२ वीमध्ये शिकणार्या आरोपीने स्वत: चा कार्यक्रम व्यवस्थापक (इव्हेंट मॅनेजर) म्हणून मुलीला आपली ओळख करून दिली. शाहरुख खानशी त्याचे संपर्क असल्याचे त्याने म्हटले होते. इव्हेंट मॅनेजर म्हणून ओळखल्या गेलेल्या शुभान शेख याला मीरा रोड येथून पोलिसांनीअटक केली. पीडित मुलगी कोलकातापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालशिपारा या भागात राहणारी आहे. कोलकाता पोलिसांनी मुंबई गाठली आणि पीडितेला परत नेले. यासह आरोपीचा ताबा घेत पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे नेण्यात आले आहे.आरोपी शेखने पीडित मुलीला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवले होते. दादर जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हावडा जंक्शन येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी पाहिल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांना सतर्क केले, तेथे आरोपींला वेळीच वेसण घालत आम्ही मुलीला सुटका केली.
Video : बॉलिवूडच्या 'बादशहा'ची भेट घडवतो म्हणून सांगितलं अन् तस्करीसाठी तरुणीला मुंबईत आणलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 22:09 IST
Crime News :आरोपी शेखने पीडित मुलीला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवले होते.
Video : बॉलिवूडच्या 'बादशहा'ची भेट घडवतो म्हणून सांगितलं अन् तस्करीसाठी तरुणीला मुंबईत आणलं!
ठळक मुद्दे कोलकाता पोलिसांनी मुंबई गाठली आणि पीडितेला परत नेले. यासह आरोपीचा ताबा घेत पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे नेण्यात आले आहे.