शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

‘त्याने’ मालकालाच बनविले दाऊदचा हस्तक, पंतप्रधानांना धोका असल्याचा संदेश पाठवला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:41 IST

या संदेशामध्ये चॅट करणारी व्यक्ती ही दाऊद इब्राहिमची हस्तक मुस्तफा अहमद आणि नवाज हे असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत. तसेच, देशात घातपात घडवून आणणार आहेत. त्यांनी मला माझा पगार दिला नसून मला वेडे बनविले असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

मुंबई : वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवाला धोका असल्याचा संदेश धडकताच  खळबळ उडाली. यंत्रणांनी तपास सुरू केला. मात्र, प्राथमिक तपासात वर्षभरापूर्वी मानसिक रुग्ण ठरवून मालकाने कामावरून काढल्याच्या रागात कामगारानेच मालकाला दाऊदचा हस्तक असल्याचे सांगून संदेश पाठविल्याची माहिती समोर आली. 

वरळी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनच्या ८४५४९९९९९९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर एका मोबाईलधारकाने रविवारी सात ऑडिओ क्लिप पाठविले. तसेच, सुप्रभात बेज नावाच्या आधार कार्डचा फोटो, नवाज अकू कबर नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर असलेले बिस्मा डायमंडचे व्हिजिटिंग कार्ड, केरळ पोलिसांचा कोविड २०१९ चा फोटोपास, असे फोटोग्राफही पाठविले. पुन्हा दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास व्हॉट्सॲप चॅटमध्ये १२ ऑडिओ क्लिप, तीन फोटो, कंपनीतील फ्रेंड सर्कलचे फोटो, तसेच चार व्हॉट्सॲपचे टाईप केलेले मेसेज असा मजकूर पाठविला. 

या संदेशामध्ये चॅट करणारी व्यक्ती ही दाऊद इब्राहिमची हस्तक मुस्तफा अहमद आणि नवाज हे असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत. तसेच, देशात घातपात घडवून आणणार आहेत. त्यांनी मला माझा पगार दिला नसून मला वेडे बनविले असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

कामगाराला दिसायचे भूत -- पोलिसांनी तत्काळ संबंधित व्हिजिटिंग कार्डवरील बिस्मा डायमंड कंपनीचे मॅनेजर नवाज अबू बकर यांना संपर्क साधून नमूद चॅट करणाऱ्या आधार कार्डवरील व्यक्तीबाबत चौकशी केली. - तेव्हा, सुप्रभात बेज नावाची व्यक्ती दोन वर्षांपूर्वी  कालिकत, केरळ येथील बिस्मा डायमंड कंपनीमध्ये सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करत होता. एक वर्षापूर्वी त्याला वेगवेगळे भास होऊ लागले. - भूत आले, कुणीतरी मारतोय, असे त्याला वाटत होते. मानसिक आजारामुळे त्याला कामावरून काढून टाकल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. प्राथमिक तपासात याच रागातून त्याने संदेश पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस