शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

मेहुणीच्या प्रेमात पडला, पत्नी आणि मुलीची हत्या करून पती पोलिसांसमोर ढसाढसा रडला

By पूनम अपराज | Updated: October 15, 2020 20:58 IST

Double Murder : त्या व्यक्तीने मेहुणीच्या प्रेमात पडल्यामुळे स्वत: च्या पत्नी व निर्दोष मुलाची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर ढसाढसा रडण्याचे नाटक करून स्वत: ला दोषी दाखविण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे मुलीने घटना पाहिली म्हणून त्याने मुलीचीही गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मेहुणीला बेडया ठोकल्या आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी घराबाहेर पडला. बाजारात त्याने खरेदी केली. त्यानंतर गंगेत स्नान केले. घरी येऊन तो रडण्याचे नाटक करू लागला.

प्रयागराज -उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये भाजप आमदाराच्या घराजवळ आई आणि निरपराध मुलाची दुहेरी हत्याकांड उघडकीस आली आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आरोपी हा मृत महिलेचा पती अजय याशिवाय दुसरं तिसरं कोणी नव्हतं. त्या व्यक्तीने मेहुणीच्या प्रेमात पडल्यामुळे स्वत: च्या पत्नी व निर्दोष मुलाची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर ढसाढसा रडण्याचे नाटक करून स्वत: ला दोषी दाखविण्याचा प्रयत्न केला.

 

उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये एका व्यक्तीने मेहुणीसाठी आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीच्या मोठ्या बहिणीशी आरोपीचे प्रेमसंबंध जुळले होते. यावरून पती आणि पत्नीत वारंवार भांडण होत असे. रोजच्या भांडणाला वातागून पतीने मंगळवारी पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. मुलीने घटना पाहिली म्हणून त्याने मुलीचीही गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मेहुणीला बेडया ठोकल्या आहेत.पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या घटनेबाबत माहिती दिली. अजय साहू असे आरोपीचे नाव असून, त्याने नऊ वर्षांपूर्वी सरितासोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोघेही कौशांबी येथील महेवा परिसरात राहू लागले. त्यांना आठ वर्षांची मुलगी होती. त्याचदरम्यान मोहित याचे सरिताच्या मोठ्या बहिणीसोबत बोलणे होत असे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत सरिताला समजल्यानंतर तिने विरोध दर्शवला. यावरून पती-पत्नीचे वारंवार खटके उडायचे. मंगळवारी अजयने पत्नी सरिता आणि मुलीची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.डबल मर्डरनंतर गंगेत केले स्नान पोलिसांच्या माहितीनुसार, दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी घराबाहेर पडला. बाजारात त्याने खरेदी केली. त्यानंतर गंगेत स्नान केले. घरी येऊन तो रडण्याचे नाटक करू लागला. पोलिसांनी मोहितचे कॉल डिटेल्स तपासले. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अजय आणि त्याच्या मेहुणीचे फोनवर तासन् तास बोलणे व्हायचे असे पोलिसांनी कॉल डिटेल्समध्ये दिसून आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मेहुणीने अजयसोबत लग्न करण्यासाठी आपल्या पतीला सोडले होते. ती आपल्या चार वर्षांच्या मुलीसोबत राहायची. प्रेमसंबंधांतून अजयने पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचे उघड झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Murderखूनmarriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक