शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लालबागच्या राजाच्या दर्शनाला पाठविले नाही म्हणून 'तो' गेला घर सोडून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 17:25 IST

वडिलांनी सायकांळी उशिरा कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

ठळक मुद्दे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पाठवले नाही म्हणून घर सोडून गेला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.सायंकाळी उशिरा आल्यानंतर सुजन घरी न परतल्याने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती विनोद यांनी केला.

नवी मुंबई  - कळंबोली येथे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलगा लालबागच्या राजाच्या दर्शनाला पाठवले नाही म्हणून घर सोडून गेला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. काल सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरातून निघालेला सुजन विनोद कुलकर्णी घरी न परतल्याने वडिलांनी सायकांळी उशिरा कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

सुजनचे वडील विनोद कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ९ तारखेच्या रात्री सोसायटीतील सर्व मुलं लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. त्यांच्यासोबत जाण्यासाठी सुजनने हट्ट केला. मात्र, दहावीत शिकणाऱ्या सुजनला वडिलांनी पाऊस पडत असल्याने लालबागला जाण्यास अटकाव केला. त्यानंतर सुजनची निराशा झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे १० सप्टेंबरला सुजन सकाळी उठला, देवपूजा करून नाश्ता करून खाली खेळण्यासाठी गेला. तो परत घरी आलाच नाही. मी भटजी असल्याने काल बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणची पूजा सांगण्यासाठी मी सकाळी ११ वाजता घर सोडलं होतं. सायंकाळी उशिरा आल्यानंतर सुजन घरी न परतल्याने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती विनोद यांनी केला. तसेच त्यांनी पुढे फोटोतील मुलगा कुणाला सापडल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे अथवा ९३२४९३३७०९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी आवाहन केले आहे. 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंLalbaugcha Rajaलालबागचा राजाNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस