शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:09 IST

या व्यक्तीने बोगस आधार कार्डचा वापर करून दुसऱ्या नावाने तिकीट बुक केलं होतं आणि आपली ओळख बदलली होती.

एक व्यक्ती बोगस आधार कार्ड वापरून विमानातून प्रवास करत होता. त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली आणि त्याने सोन्याची तस्करी करण्याचा एक अनोखा कट रचला. त्याने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं सोनं परदेशातून आणलं आणि विमानामध्येच बेवारस सोडून दिलं. हे सगळं त्याने जाणूनबुजून केलं, जेणेकरून परदेशातून आल्यामुळे तो चौकशीत अडकू नये. झालंही तसंच, तो मुंबई विमानतळावरून आरामात बाहेर पडला. दोन दिवस सोनं विमानातच राहिलं आणि विमान उडत राहिलं. पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या भुवया उंचावतील.

परदेशातून आलेला हा तस्कर १४ जून रोजी कोलकाताहून चेन्नईला आला, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला देशांतर्गत टर्मिनलवर ताब्यात घेतलं. त्याच्याकडून पेस्टच्या स्वरूपात १.१३ किलो सोनं जप्त करण्यात आलं. हा व्यक्ती मुंबईला उतरला होता, तर कोलकाताला कसा पोहोचला? ही घटना कालक्रमानुसार समजून घेण्यासाठी काही गोष्टी उलट तपासल्या गेल्या. तपासात असं निष्पन्न झालं की, हे सोनं तो बंगालमधून नव्हे, तर अबू धाबीहून तस्करी करून घेऊन आला होता. त्याची ही पूर्ण चाल पाहून अधिकारीही थक्क झाले.

तपासात असंही समोर आलं की, तो अबू धाबीहून मुंबईला सोन्याची तस्करी करत होता. स्वतःला वाचण्यासाठी त्याने देशांतर्गत मार्गातून चेन्नईला सोनं आणण्याचा प्रयत्न केला. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, या तस्कराने १२ जून रोजी अबू धाबीहून पेस्टच्या स्वरूपात सोनं आणलं आणि ते आपल्या सीटखाली लपवून ठेवलं. सोनं तिथेच बेवारस पडून होतं. तो मुंबई विमानतळावरून आरामात सोनं न घेताच बाहेर पडला. त्यानंतर तिथून तो चेन्नईत गेला.

विमानाचा मागोवा घेतला आणि...त्याने विमानाचा युनिक नंबर वापरून सतत त्याचा मागोवा घेतला. हे करणं खूप सोपं आहे, कारण आजकाल अनेक साईट्सवर लाइव्ह ट्रॅकिंग उपलब्ध आहे. त्याला कळलं की, हेच विमान १४ जून रोजी कोलकाताहून चेन्नईसाठी उड्डाण करणार आहे. त्याने तात्काळ कोलकाताला जाण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, तो चेन्नईहून कोलकाताला गेला आणि इंडिगोच्या त्याच विमानात त्याच सीटवर परत बसला, जिथे त्याने सोनं ठेवलं होतं. त्याने तिथेच असलेलं सोनं आरामात बाहेर काढलं.

आता ४८ तासांनंतर सोनं घेऊन तो चेन्नई विमानतळावरून बाहेर पडू लागला. मात्र, यात तो यशस्वी होऊ शकला नाही. तपासात असंही निष्पन्न झालं की, त्याने बोगस आधार कार्डचा वापर करून दुसऱ्या नावाने तिकीट बुक केलं होतं आणि आपली ओळख बदलली होती. त्याच्याकडून दोन बोगस आधार कार्ड आणि ८९८ ग्रॅम सोनं देखील जप्त करण्यात आलं. एकूण त्याच्याकडून २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीGoldसोनंAirportविमानतळ