शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीने वार करून पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, नंतर पतीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:29 IST

Attack on Wife : सुरेश रामचंद्र चांगाेले (४०, रा. आष्टी) असे मृतकाचे नाव आहे, तर पत्नी मंगला चांगाले ही गंभीर जखमी असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली.

तळेगाव (श्या.पंत)/(वर्धा) : कौटुंबिक कलहातून पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने दोन वार करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीने स्वत: झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक थरारक घटना दि. १२ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भारसवाडा शिवारात उघडकीस आली.

सुरेश रामचंद्र चांगाेले (४०, रा. आष्टी) असे मृतकाचे नाव आहे, तर पत्नी मंगला चांगाले ही गंभीर जखमी असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली. मंगला सुरेश चांगाेले (३८) ही घरी असताना आरोपी पती सुरेश चांगोले याचा तिच्याशी घरगुती कारणातून वाद झाला. दरम्यान, सुरेशने रागाच्या भरात पत्नी मंगलाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने दोन वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी मंगलाचा भाऊ अंकुश काशिनाथ राऊत याने याबाबतची तक्रार तळेगाव पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी सुरेशविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ही घटना ११ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी आरोपी सुरेशचा शोध पोलीस घेत असतानाच तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भारसवाडा गावातील शेतशिवारात आरोपी सुरेशने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दि. १२ रोजी मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भारसवाडा येथे जाऊन पंचनामा करून सुरेश चांगोले याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला असून पत्नी मंगलावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसा