शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Hathras : हाथरस हादरलं! आधी केला मुलीचा विनयभंग; जामीन मिळाल्यावर तिच्या वडिलांना घातल्या गोळ्या

By पूनम अपराज | Updated: March 2, 2021 13:42 IST

Hathras Molestation and then shot dead victim's Father : जामिनावर सुटलेला आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ठळक मुद्दे महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर गौरव शर्माला स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यानंतर तो बाहेर होता.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. २०१८ मध्ये हाथरस Hathras येथे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या आरोपीला जामीन मिळाला. त्यानंतर जामिनावर सुटलेला आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.हाथरस पोलिसांनी सांगितले की, आरोपी गौरव शर्माला 2018 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावातील एका मंदिराबाहेर आरोपी व पीडितेच्या कुटूंबात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर गौरवने गोळीबार केला. पीडितेच्या वडिलांचा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर गौरव शर्माला स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यानंतर तो बाहेर होता. हाथरसचे पोलीस प्रमुख विनीत जयस्वाल यांनी ट्विटरवर दिलेल्या व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, 'मृताने जुलै २०१८ मध्ये आरोपीविरोधात लैंगिक शोषणासाठी गुन्हा दाखल केला होता. आरोपी तुरूंगात गेला आणि महिनाभरानंतर जामिनावर सुटला. दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाले असून चांगले संबंध नव्हते. आरोपीची पत्नी व काकू दोघेही गावातील मंदिर पूजेसाठी आले होते. पीडित मुलगी आणि तिची बहीण तिथे आधीच हजर होते. इथल्या एका गोष्टीवरून महिलांमध्ये भांडण चालू होते. यानंतर आरोपी व पीडितेचे वडीलही भांडणात सामील झाले आणि भांडण टोकाला गेले. यानंतर आरोपी संतप्त झाला आणि त्याने आपल्या कुटूंबाच्या  इतर मुलांना बोलावून पीडित मुलीच्या वडिलांना गोळी घातली. Out On Bail, Man Accused Of Sex Assault Kills Woman's Father In UP.सोमवारी पीडित महिला पोलिस स्टेशनच्या बाहेर रडत आणि न्यायाची मागणी करताना दिसली. ती म्हणाली, 'मला न्याय द्या. आधी त्याने माझा विनयभंग केला आणि आता माझ्या वडिलांना गोळीबार करून ठार केलं.  तो आमच्या गावात आला. त्याच्यासमवेत सहा-सात जण होते. माझ्या वडिलांची कोणाशीही वैर नव्हते. गौरव शर्मा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी आतापर्यंत गौरव शर्माच्या कुटूंबातील सदस्यास अटक केली आहे.

टॅग्स :MurderखूनFiringगोळीबारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMolestationविनयभंगsexual harassmentलैंगिक छळ