शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

Hathras Gangrape : नातेवाईकांना नाही दिला मृतदेह, धरणे आंदोलनावर बसले वडील अन् भाऊ 

By पूनम अपराज | Updated: September 29, 2020 19:10 IST

आम्हाला कोणताही पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाला नाही. आम्ही कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नाही. आमच्या परवानगीशिवाय हॉस्पिटल मृतदेह कसा घेऊ जाऊ शकतो असा सवाल पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ठळक मुद्देपीडितेच्या भावाने सांगितले की, वडिलांनी रुग्णवाहिका चालकाशी बोलणं केलं आहे. रुग्णवाहिका यमुना एक्स्प्रेसवे पुढे गेली आहे.

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे वडील व भाऊ सफदरजंग रुग्णालयात धरणे आंदोलनावर बसले आहेत. आमच्या परवानगीशिवाय मृतदेह दवाखान्यातून नेण्यात आला असा आरोप त्यांनी केला. आम्हाला कोणताही पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाला नाही. आम्ही कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नाही. आमच्या परवानगीशिवाय हॉस्पिटल मृतदेह कसा घेऊ जाऊ शकतो असा सवाल पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.पीडितेच्या भावाने सांगितले की, वडिलांनी रुग्णवाहिका चालकाशी बोलणं केलं आहे. रुग्णवाहिका यमुना एक्स्प्रेसवे पुढे गेली आहे. वडिलांनी ड्रायव्हरला परत येऊन पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवायला सांगितले आहे. जर हे सर्व घडले नाही तर हाथरसातील मृतदेह कोणीही स्वीकारणार नाही.चंद्रशेखर आझाद यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केलेत्याचवेळी भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सोमवारी रात्री डॉक्टरांनी व्हेंटिलेटरचे प्लग काढून टाकले होते, सरकारची पीडितेचा मृत्यू व्हावा अशी सरकारची इच्छा होती ती दलित समाजातील होती. चंद्रशेखर आझाद म्हणाले की, पीडित मुलीच्या पालकांसह येथे कोणताही पोलिस कर्मचारी नव्हता.सीआरपीएफ रुग्णालयात तैनात

चंद्रशेखर आझाद आज पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात गेले होते. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी सकाळी हाथरस घटनेतील पीडितेचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेवर राजकीय गदारोळ सुरू आहे.कुटुंब म्हणाले - एडीजी खोटे बोलत आहेएडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांच्या वक्तव्यावर पीडितेच्या कुटूंबाने प्रतिक्रिया दिली आहे. एडीजी खोटे बोलत असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. पीडित मुलीने आपले 22 सप्टेंबर रोजी पहिले स्टेटमेंट दिले होते आणि सामूहिक बलात्काराबद्दल माहिती दिली होती. यापूर्वी कोणालाही माहिती नव्हते की तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे, कारण ती बेशुद्ध होती.एडीजी काय म्हणाले?आज तकशी बोलताना एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, ही घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता घडली. त्यानंतर, मुलगी आपल्या भावासोबत पोलिस स्टेशनला आली आणि गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मुलीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब एससी / एसटी कायद्याशी संबंधित होती, म्हणून याप्रकरणाची चौकशी क्षेत्राधिकारी स्तरावरील अधिकारी यांच्याकडे देण्यात देण्यात आली.

 

 

 

 

टॅग्स :agitationआंदोलनhospitalहॉस्पिटलGang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसDeathमृत्यू