शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षांच्या मुलाने फोन चोरी करताना पकडवून दिलं; २ महिन्यांनी १६ वर्षांच्या मुलाने त्याचीच हत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:29 IST

हरियाणा पोलिसांनी सात वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

Haryana Crime: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने सात वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. दोन महिन्यांपूर्वी  आरोपी मुलाने एक मोबाईल चोरला होता. त्याची चोरी पीडित मुलाने पकडून दिली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी आरोपीला माफी मागायला लावली होती. त्याचाच राग आरोपी मुलाच्या मनात होता. याच रागातून त्याने सात वर्षाच्या मुलाला संपवलं. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरु केली आहे.

गुरुग्राममध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने बदला घेण्यासाठी सात वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. दोन महिन्यांपूर्वी, आरोपी मुलाने एका माणसाचा फोन चोरला होता. पण त्या माणसाच्या ७ वर्षांच्या मुलाने तो फोन चोरताना पाहिला. त्याने त्याच्या वडिलांना या चोरीची माहिती दिली. त्यानंतर आरोपी मुलाकडून फोन जप्त करण्यात आला. आरोपी मुलाला माफी मागण्यास सांगितले, जे त्याला आवडले नाही. त्यानंतर त्याच १६ वर्षांच्या मुलाने ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली.

या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. १९ जुलै रोजी जेव्हा मुलाची आई संध्याकाळी ७ वाजता घरी परतली तेव्हा तिला तिचा मुलगा सापडला नाही. तिला वाटले की तो इतर मुलांसोबत खेळत असावा. तर वडील रात्री ८ वाजता कामावर निघून गेले होते. त्यानंतर २० जुलै रोजी बस स्टँडजवळ एका मुलाचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या छातीवर आणि कपाळावर जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी मृतदेहाची ओखळ पटवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या चौकशीत आरोपीने फोन चोरल्याची कबुली दिली. सात वर्षांच्या मुलाने नावं सांगितले आणि मला माफी मागायला लागली. म्हणूनच मुलाला घराबाहेर बोलवलं. नंतर त्याच्यावर कात्रीने १८ ते २० वेळा वार केले, असं आरोपी मुलाने सांगितले. गावातील एका खोलीतून आरोपीला पकडण्यात आले. घटनास्थळावरून हत्येत वापरलेली कात्री जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी फिंगरप्रिंट, फॉरेन्सिक आणि क्राइम सीन एक्सपर्टसह घटनास्थळाची तपासणी केली.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी