शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरुन मारहाण; कंत्राटदाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 20:58 IST

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल;  दोन युवकांना अटक

मडगाव - रस्त्यावर ऑम्लेट पाव खाताना दुसऱ्या एका गाडीचा धक्का बसला या कारणावरुन त्या गाडीवाल्याचा पाठलाग करुन त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून मडगाव पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. क्षुल्लक कारणासाठी या दोघांवरही सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात  आहे.मडगावचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मूळ बिहारचा असलेल्या  सुरेशकुमार सिंग या कंत्राटदाराला मारहाण करुन त्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली रुमडामळ-दवर्ली येथील प्रितेश चव्हाण (वय 20) आणि  मांडप-नावेली येथील विलास नाईक (वय 21) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 427, 341 आणि 304 या अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, 12 ऑक्टोबर रोजी सिकेटी-नावेली येथे ही घटना घडली होती. प्रितेश व विलास हे दोघेही रस्त्याच्या बाजूला ऑम्लेट पाव खाण्यासाठी थांबले असता सुरेशकुमार यांच्या कारने त्यांच्या बाईकला धक्का दिला. हा धक्का दिल्यानंतर कुमार याने तिथे न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भडकलेल्या त्या दोन्ही युवकांनी त्याचा पाठलाग करत त्याला सिकेटी-नावेली येथे अडविले आणि त्याला मारहाण केली.त्या घटनेनंतर फोंडा येथे काम करणारा सुरेशकुमार कामासाठी गेला असता 18 ऑक्टोबर रोजी कामावर असतानाच तो भोवळ येऊन खाली पडला. त्याला फोंडा येथील आयडी रुग्णालयात दाखल केले असता झालेल्या मारहाणीची त्याने तेथील डॉक्टरांना माहिती दिली. त्याला लगेच बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या शवविच्छेदन झाल्यानंतर त्याला झालेल्या मारहाणीमुळे त्याचे बरगडीचे हाड मोडून त्यामुळे फुफ्फुसात झालेल्या जखमेचे इन्फेक्शन झाल्यामुळे  मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला मडगाव पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते.  शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून