शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
4
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
5
IND vs AUS : "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
6
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
7
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
8
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
9
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
10
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
11
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
12
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
13
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
14
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
15
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
16
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
17
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
18
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
19
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
20
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 

बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:43 IST

हंसिका यादव तिचा प्रियकर प्रदीपसोबत सोमवारी दुपारी नवोदय नगरमध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.

हरिद्वारमधील सिडकुल औद्योगिक क्षेत्रात सोमवारी दुपारी एका प्रियकराने भरदिवसा आपल्या प्रेयसीचा चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोघांमध्ये झाली होती बाचाबाचीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची आझाद नगर, नाथपुरी, सीतापूर येथील २२ वर्षीय हंसिका यादव तिचा प्रियकर प्रदीपसोबत सोमवारी दुपारी नवोदय नगरमध्ये फिरायला गेली होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये कोणत्यातरी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. याच दरम्यान युवकाने खिशातून चाकू काढला आणि हंसिकाच्या गळ्यावर सपासप वार केले. हल्ला होताच तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळली.

चार वर्षांपासून सुरू होतं प्रेमप्रकरणमाहिती मिळताच सिडकुल पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तरुणीला रुग्णालयात घेऊन गेले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ही तरुणी सिडकुलमधील एका खासगी कारखान्यात काम करत होती आणि नवोदय नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. पोलीस तपासात समोर आले आहे की, हंसिकाचे आरोपी प्रदीपसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा युवक अनेकदा तिला भेटायला येत असे. तो देखील सीतापूरचाच रहिवासी आहे.

आरोपीचा शोध सुरूहरिद्वारचे एसएसपी प्रमेंद्र सिंह डोबाल यांनी सांगितले की, आरोपी युवकाची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल कॉल डिटेल्सच्या आधारे पोलीस आरोपीच्या शोधात छापेमारी करत आहेत. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे दिसत आहे, परंतु तपासाअंतीच खरे कारण समोर येईल. मृत तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीharidwar-pcहरिद्वारUttar Pradeshउत्तर प्रदेश