शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत 'तो' घरी आला, वैतागलेल्या पत्नीने 30 सेकंदात 15 वेळा मारलं, आई-बहिणीनेही बदडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 19:30 IST

दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. दुकानातून मिळणाऱ्या पैशातून पती रोज दारू पिऊन गोंधळ घालतो.

उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये दारूच्या नशेत असलेल्या पतीला घरातील सदस्यांना त्रास देणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याची पत्नी, आई आणि बहिणीने मिळून त्याची यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली आहे. तिघींनी मिळून दारू पिऊन घरी आलेल्या व्यक्तीला 30 सेकंदात 15 वेळा मारलं. मारहाण केल्याचा हा व्हिडीओ समोर आला असून तो आता जिल्ह्यात जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

भानपूर येथील रहिवासी असलेला अमित अवस्थी हा बालामऊ येथील रेल्वे गंज येथे एका खासगी दुकानात काम करतो. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. दुकानातून मिळणाऱ्या पैशातून तो रोज दारू पिऊन गोंधळ घालतो. शुक्रवारीही अमित दारू पिऊन घरी पोहोचला आणि गोंधळ घालू लागला. 

पतीच्या या त्रासाला वैतागलेल्या पत्नी शिखाने सासू व नणंदेसह अमितला काठ्यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान रस्त्यावरून जाणारे व दुकानदार हे दृश्य पाहत राहिले. दररोज पत्नीकडून मारहाण होत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. अनेकवेळा घरच्यांनी त्याला पोलीस ठाण्यात पाठवलं पण त्यात काहीच सुधारणा झाली नाही.

न्यायाधिकारी बघौली विकास कुमार जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तीन महिला त्या तरुणाला काठ्यांनी मारहाण करत आहेत. मारहाण करणाऱ्या महिला त्याची पत्नी, आई आणि बहीण असल्याचे सांगण्यात येत आहे. दारूच्या नशेत गोंधळ घातल्याने नातेवाईकांनी मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी