शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाकडमध्ये घरात घुसून शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 17:49 IST

घराशेजारील मोक्याची जागा आणि त्यावर बांधलेले घर विकत न दिल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराने शेजाऱ्यावर घरात घुसून सत्तूरने सपासप वार करीत जीवघेणा हल्ला चढविला.

ठळक मुद्देशेजारील प्लॉट आणि घर विकत न दिल्याचा राग  

पिंपरी : घराशेजारील मोक्याची जागा आणि त्यावर बांधलेले घर विकत न दिल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराने शेजाऱ्यावर घरात घुसून सत्तूरने सपासप वार करीत जीवघेणा हल्ला चढविला. हा प्रकार सोमवारी (दि ८) रात्री नऊच्या सुमारास मंगल नगर वाकड येथे घडला.    या हल्ल्यात श्रीकांत महादेव सुर्वे (वय ३५, रा.  मंगल नगर वाकड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर थेरगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी वासंती श्रीकांत सुर्वे (वय ३३, रा. मंगल नगर वाकड) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार बबलू जोगदंड या सराईत गुन्हेगारासह त्याचा एक साथीदार, त्याची आई व बहीण (नावे समजू शकली नाहीत, सर्वजण रा. मंगल नगर वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. याबाबत माहिती अशी फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी राहायला आहेत. आरोपीच्या शेजारी असलेला एक मोकळा प्लॉट आणि त्यावरील बांधलेल्या घरावर  आरोपीचा घ्यायचे होते. मात्र संबंधित घर पूर्वीच्या मालकाने आरोपीला माहिती होऊ न देता दोन वर्षांपूर्वी सुर्वे कुटुंबियांशी व्यवहार करत प्लॉट विकला याचा राग आरोपीच्या मनात होता .यानंतरही आरोपी जोगदंड याच्या सुर्वे यांना घर व प्लॉट कमी किमतीत देण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या सुरू होत्या. मात्र, फिर्यादी त्याला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने जोगदंड याला राग होता.या रागातूनच सोमवारी रात्री नऊच्या सुमारास जोगदंड त्याचे साथीदार व आई, बहीण या सर्वांनी संगनमताने सुर्वे कुटुंबियांवर हल्ला करण्याचे संगनमत केले त्यानुसार आरोपी हातात लोखंडी सत्तुर घेऊन आरोपींनी फियार्दीच्या घरात जबरदस्तीने घुसून जीवघेणा हल्ला चढवित सुर्वे यांच्या  डोक्यावर, पायावर, पाठीवर सततुरने वार करून गंभीर जखमी केले तर फियार्दी यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ करून ते सर्वजण पसार झाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस