शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालक नसता तर तरुणीचा झाला असता साैदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:57 IST

लग्नाचे आमिष दाखवून रेड लाईट एरियात विक्रीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत आणलेल्या उत्तर प्रदेशच्या तरुणीचा वेश्या व्यवसायासाठी चाळीस हजारांत सौदा होणार होता, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे प्रियकराचा डाव फसला आणि विक्रीपूर्वी तो टिळकनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला गेला. 

टिळकनगर पोलिसांनी अमन शर्मा आणि त्याची पत्नी आंचल शर्माला अटक केली आहे. तक्रारदार १८ वर्षीय तरुणी मूळची उत्तरप्रदेशच्या शेतकरी कुटुंबातील आहे.  तेथे आई-वडील आणि तीन भावंडांसोबत राहते. घरच्यांशी तिचे पटत नव्हते. यादरम्यान फेब्रुवारीमध्ये तिची तेथील एका दुकानात अमनसोबत ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढला. भेटीगाठी वाढून दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. तीन ते चार दिवसांपूर्वी अमनने ‘हम यहाँसे कही दूर भाग जा के शादी करेंगे’ असे म्हटले होते. मुंबईत जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिनेही त्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली.

ठरल्याप्रमाणे अवघ्या तीन महिन्यांच्या ओळखीतून १८ मे रोजी अमनने घराजवळून तिला सोबत घेत रेल्वेने बनारस गाठले. तेथून मुंबईला जाणार असल्याचे सांगितले. रविवारी पहाटे चारच्या सुमारास ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचली. तेथे पोलिसांनी वेळीच धाव घेत तरुणीची सुटका केली आहे.

बायकोला बनवले वहिनी बनारस येथे पोहोचल्यानंतर, आंचल ८ महिन्यांच्या बाळासहित तेथे धडकली. ती भावाची बायको असल्याचे सांगून सोबत मुंबई फिरण्यासाठी येत असल्याचे अमनने तरुणीला सांगितले होते.

रिक्षाचालकाचा कॉल अन् सुटका... लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अमन एका रिक्षाचालकाकडे गेला. तेथे रेड लाईट एरियाबाबत चौकशी करताच, रिक्षाचालकाने तेथे का जायचे? याबाबत विचारले. अमनने तरुणीच्या दिशेने इशारा करत तिला ४० हजारांत तेथे विकायचे असल्याचे रिक्षाचालकाला सांगितले. रिक्षाचालकाला संशय आला. त्याने, तत्काळ पोलिसांना माहिती दिली.  टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत मुलीला सुखरूप ताब्यात घेत, अमन आणि त्याच्या बायकोला बेड्या ठोकल्या आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी