नशेत फूल टल्ली असलेल्या मॉडलने भर रस्त्यात घातला धिंगाणा, सेनेच्या जिप्सीचंही केलं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:47 PM2021-09-09T12:47:24+5:302021-09-09T12:58:18+5:30

काही वेळानंतर ती सेनेच्या जिप्सीला लाथा मारू लागली, ज्यामुळे जिप्सीचा हेडलाइट फुटला. जेव्हा जिप्सीतून जवान बाहेर आला तर त्यालाही तरूणीने धक्का दिली.

Gwalior drunk girl stopped army gypsy kicked and broke headlight | नशेत फूल टल्ली असलेल्या मॉडलने भर रस्त्यात घातला धिंगाणा, सेनेच्या जिप्सीचंही केलं नुकसान

नशेत फूल टल्ली असलेल्या मॉडलने भर रस्त्यात घातला धिंगाणा, सेनेच्या जिप्सीचंही केलं नुकसान

Next

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरात भर रस्त्यात नशेत असलेल्या एका तरूणीने धिंगाणा घातला. ही तरूणी दिल्लीतील मॉडल असल्याचं  सांगितलं जात आहे. तरूणीने रस्त्यावर उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडवलं. त्यामुळे तमाशा बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.  अशातच तिथे सेनेची जिप्सी गाडी आली. ती सुद्धा तरूणीने रोखली आणि गाडीला टेकून उभी राहिली.

काही वेळानंतर ती सेनेच्या जिप्सीला लाथा मारू लागली, ज्यामुळे जिप्सीचा हेडलाइट फुटला. जेव्हा जिप्सीतून जवान बाहेर आला तर त्यालाही तरूणीने धक्का दिली. हा सगळा हायव्होल्टेज ट्रामा पडाव पोलीस स्टेशनजवळ सुरू होता. पोलीस स्टेशनमध्ये कुणीही महिला पोलीस नसल्याने तरूणीला कुणी पकडू शकलं नाही. लोक तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. काही वेळाने जेव्हा महिला पोलीस आल्या तर तरूणीला ताब्यात घेण्यात आलं.

ताब्यात घेण्यात आल्यावर तरूणीचं मेडिकल करण्यात आलं. तर ती नशेत असल्याचं समोर आलं. तिला वाचवण्यासाठी दोन इतर महिला पोलीस स्टेशनमध्ये आल्या. या तिघीही दिल्ली असल्याचं सांगितलं जात आहे. पण हे समजू शकलं नाही की, या तिन्ही महिला दिल्लीहून ग्वाल्हेरला कशासाठी आल्या होत्या.

या तरूणीने ब्लॅक कलरचा स्कर्ट आणि व्हाइट कलरचा टॉप घातलेला होता. तिचं वय साधारण २२ ते २३ वर्षे असेल. ती जवळच्याच एका हॉटेलमधून नशेच्या स्थितीत बाहेर पडली होती. 

पडाव पोलीस स्टेशनचे टीआय विवेक अष्ठाना म्हणाले की, रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तरूणीला पकडण्यात आलं आहे. तिची चौकशी केली जात आहे की, तिने रस्त्यावर धिंगाणा का घातला आणि ती ग्वाल्हेरला का आली होती.
 

Web Title: Gwalior drunk girl stopped army gypsy kicked and broke headlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.