उल्हासनगरात ६ लाख ६६ हजाराचा गुटखा जप्त; २ जण ताब्यात
By सदानंद नाईक | Updated: November 26, 2023 16:42 IST2023-11-26T16:42:11+5:302023-11-26T16:42:27+5:30
शहरातील पान टपरी, हॉटेल, किराणा दुकानात गुटका सर्रासपणे विकला जात आहे.

उल्हासनगरात ६ लाख ६६ हजाराचा गुटखा जप्त; २ जण ताब्यात
उल्हासनगर : हिललाईन पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रतिबंधित केलेल्या गुटख्याने भरलेला टेम्पो जप्त केला असून त्यामध्ये ६ लाख ६६ हजार किमंतीचा गुटखा असल्याचे उघड झाले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प परिसरात गुटख्याचा टेम्पो येत असल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून शुक्रवारी मध्यरात्री कुर्ला कॅम्प येथून एमएच-४८, टी-८१२६ क्रमांकाच्या टेम्पोची झडती घेतली असता, टेम्पोत प्रतिबंधित केलेला गुटखा भरलेला असल्याचे उघड झाले. टेम्पो चालक सलमान व त्याचा मित्र सद्दम खान या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन टेम्पो जप्त केला. शहरातील पान टपरी, हॉटेल, किराणा दुकानात गुटका सर्रासपणे विकला जात असून गेल्या महिन्यात सहा पान टपऱ्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला. मात्र गुटखा विक्री काही थांबली नाही. आजही सर्रासपणे कुठेही गुटखा विक्री केला जात असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी टेम्पोत ६ लाख ६६ हजाराचा गुटखा असल्याची नोंद करून दोघांना अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.