शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गुजरातवरून आलेला 35 लाखाचा गुटखा जप्त, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 08:56 IST

चौघांना अटक : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

ठळक मुद्देनवी मुंबईत मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. शहरातील छोट्या मोठ्या विक्रेत्यांना हा माल पुरवणाऱ्यांवर पोलीस नजर ठेवून होते.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : गुन्हे शाखेने रबाळे एमआयडीसी येथून 35 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. गुजरात मधून हा माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र ट्रक मधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली. 

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. शहरातील छोट्या मोठ्या विक्रेत्यांना हा माल पुरवणाऱ्यांवर पोलीस नजर ठेवून होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक देखील त्यांच्या मागावर होते. अशातच गुजरात वरून ट्रक मधून मोठया प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन भालेराव यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा  उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी तपास पथक तयार केले होते. त्यात सहायक निरीक्षक विनया पारासूर, हवालदार सचिन भालेराव, कासम पिरजादे, इकबाल शेख, संजय चौधरी, रमेश उटगीकर, योगेश नाईक व बाबा सांगोलकर यांचा समावेश होता. त्यांनी गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रबाळे एमआयडीसी मधील ओयो सिल्वर हॉटेल समोरील मोकळ्या मैदानभवती सापळा रचला होता. काही वेळाने त्याठिकाणी एक ट्रक (एम.एच. 14 एफ.टी. 410) येऊन थांबला असता इतरही दोन वाहने तिथे आली. यावेळी ट्रक मधून इतर पिकअप (एम.एच. 43 बी.बी. 1856) व कार (एम.एच. 43 ए.आर. 7601) या दोन वाहनांमध्ये गोण्या भरल्या जात असताना पोलिसांनी छापा टाकला. त्यांनी ट्रक मधून उतरल्या जाणाऱ्या गोण्या तपासल्या असता त्यात विमल कंपनीचा गुटखा आढळून आला.  पोलिसांची कारवाई सुरु असताना ट्रक चालकाने अंधारात पळ काढला. मात्र इतर चौघे पोलिसांच्या हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. जितू कार्तिकचंद्र दास (28), प्रियव्रत अभयकुमार दास (25), मुन्ना श्रीजनार्धन यादव (28) व अखेय बुद्धदेव खोंडा (22) अशी त्यांची नावे आहेत. ते कोपर खैरणे व इतर परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याकडून 35 लाख 53 हजार रुपये किमतीचा गुटखा तसेच 14 लाख रुपये किमतीची तीन वाहने असा 49 लाख 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. 

चौकशीत त्यांनी हा माल गुजरात मधून आल्याची कबुली दिली आहे. मात्र ट्रक चालकाने पळ काढल्याने गुजरात मधून नेमका कुठून हा गुटखा आला याचा उलगडा होऊ शकला नाही. दरम्यान अटक केलेल्या चौघांसह पळालेल्या ट्रक चालकाविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बुधवंत यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई