शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! २७ वर्ष लहान महिलेसह लग्न, संबंध ठेवताना घेत होता चावा; न्यायालयाने दिले अटकेसह बत्तीशी काढून घेण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 14:26 IST

Crime News : एका महिलेने पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवली होती.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिसेंबर २०२१ च्या सुरुवातीला एका महिलेने पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवली होती. दरम्यान, आपला पती अनैसर्गिक संबंध ठेवत असल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं होतं. यासोबतच तो पहिल्या रात्रीपासूनच सातत्यानं असं करत होता, तसंच संपूर्ण शरीरावर चावा घेत असल्याचंही महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. 

पीडित महिलेचा विवाह गुजरातच्या ६७ वर्षीय ज्वेलरसह झाला होता. महिला ही मूळ इंदूरची रहिवासी आहे. विवाहानंतर ती गुजरातमध्ये गेली. पतीपेक्षा ती २७ वर्षांनी लहान आहे. त्या महिलेचं हे दुसरं लग्न होतं. विवाहानंतर पती आपल्याला उदयपूर येथे नेलं. त्या ठिकाणीही त्यानं असं केलं. तसंच त्यानं बनावट दात लावले असल्याचंही महिलेनं सांगितलं.

जेव्हा आपण या कृत्याचा विरोध केला तेव्हा तेव्हा पतीनं आपल्याला धमकी दिली. तसंच आपल्याकडे भरपूर पैसे असून बड्या लोकांसोबतही ओळख असल्याचं तो सांगत होता, असं महिलेनं म्हटलं. परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला महिला पळून जाण्यास यशस्वी ठरली आणि त्यानंतर तिनं इंदूरमध्ये याविरोधात तक्रार केली. त्या दोघांचाही विवाह २८ ऑक्टोबरला झाला होता.

धमकीही दिलीजर याबद्दल कुठेही वाच्यता केली तर संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचंही तिनं म्हटलं. यानंतर महिला घाबरली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकले. पत्नीनं डिसेंबर महिन्यात त्याच्याविरोधात अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करत असल्याची याचिका दाखल केली होती. महिलेनं न्यायालयासमक्ष तिच्या पतीनं केलेल्या कृत्यांमुळे झालेल्या जखमांचाही उल्लेख केला. हा गंभीर गुन्हा असल्याचं सांगत न्यायालयानं तिच्या पतीच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिली. तसंच त्याची बत्तीशी जप्त करण्यासही सांगितलं आहे. आरोपी ७ डिसेंबरपासूनच फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न