शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:21 IST

गुजरातमध्ये मेहुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या जावयाने बहिण भावाची निर्घृणपणे हत्या केली.

Gujarat Crime: गुजरातमध्ये बहीण आणि भावाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये एका व्यक्तीने त्याच्या मेहुणी, मेहुणा आणि सासूवर निर्घृणपणे हल्ला केला. या हल्ल्यात मेहुणा आणि मेहुणीचा मृत्यू झाला, तर सासू जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. सूरतमधल्या या आरोपीला त्याच्या २० वर्षांच्या मेहुणीसोबत लग्न करायचे होते. पत्नी आणि तीन मुले असूनही, तो तिच्या प्रेमात पडला होता. ती त्याच्याशी लग्न करेल या आशेने तो तिला अश्लील व्हिडिओ आणि अश्लील मेसेजही पाठवायचा असे. पण मेहुणीचे त्याच्यावर प्रेम नव्हते. याचाच संताप आल्याने बहिणीच्या नवऱ्याने मेहुणी आणि मेहुण्याला संपवून टाकलं.

मृत भाऊ आणि बहीण त्यांच्या आईसह चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सुरत येथे भावाच्या लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. प्राथमिक पोलिस तपासात मोठ्या बहिणीच्या पतीला त्याच्या मेहुणीशी लग्न करायचे होते. या वादातून त्याने सासू, मेहुणी आणि मेहुण्यावर हल्ला केला. हल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. सुरत शहरातील उधना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पटेल नगर परिसरातील साई जलाराम सोसायटीमधील एका घरात बुधवारी रात्री हे हत्याकांड घडले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. 

पत्नी आणि मुलांसह तिथे राहणाऱ्या ३४ वर्षीय संदीप घनश्याम गौरने त्याच्याच मेहुणी आणि मेहुण्याची हत्या करुन पळ काढला. लग्नाच्या खरेदीसाठी मेहुणी, मेहुणा आणि सासू  मोठ्या मुलीच्या घरी आले होते. ८ ऑक्टोबर रोजी बहिणीच्या पतीने अचानक एक मागणी केली. "मला माझ्या मेहुणीशी लग्न करायचे आहे." हे ऐकून सगळेच स्तब्ध झाले. त्यानंतर घरात जोरदार वाद झाला आणि त्यातून हाणामारी झाली. बहिणीचा पती इतका संतापला की त्याने मेहुणी आणि मेहुण्याची हत्या केली. त्याने आपल्या सासूलाही गंभीर जखमी केले.

संदीप घनश्याम गौर याचा मेहुणा निश्चय अशोक कश्यप, बहीण ममता कश्यप आणि आई शकुंतला देवी यांच्यासह ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लग्नाच्या खरेदीसाठी  प्रयागराजहून सुरतला आले होते. बुधवारी रात्री उशिरा संदीप गौरने सासूकडे ममतासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मला माझ्या मेहुण्याशी लग्न करायचे आहे, असं त्याने उघडपणे म्हटलं. संदीपची मागणी ऐकून सासूला धक्का बसला.  जर ममता माझी झाली नाही तर मी तिला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही, अशीही धमकी त्याने दिली. ममतानेही मी माझ्या बहिणीचा विश्वासघात करू शकत नाही. मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असं सांगून टाकले. याचाच राग संदीपला आला. त्याने रागाच्या भरात ममता, निश्चय आणि सासूवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ममता आणि निश्चयचा जागीच मृत्यू झाला. तर सासूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिस