शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हुंड्यात फॉर्च्युनरच हवी म्हणून नवऱ्याने घातली गळ; PhD पास वधू राहिली बसून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 21:42 IST

Dowry Case : घटनास्थळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी जाब विचारला असता रात्री २/३ वाजेपर्यंत वारंवार बोलावून देखील वरपक्ष फेरे मारण्यास आले नसल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून फेऱ्या मारताय, नंतर काहीही करू शकता.

करनाल - हरियाणातील करनाल जिल्ह्यात पीएचडी पास वधूचे सातफेरे पैशाची आणि फॉर्च्युनर कारची मागणी पूर्ण न झाल्यामुळे थांबले. रात्रभर वधू लग्नातील सात फेऱ्यांची वाट पाहत बसली होती. सकाळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. सकाळी आठ वाजता पोलिसांसमोर फेऱ्या मारण्यासाठी वर तयार झाला. घटनास्थळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी जाब विचारला असता रात्री २/३ वाजेपर्यंत वारंवार बोलावून देखील वरपक्ष फेरे मारण्यास आले नसल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून फेऱ्या मारताय, नंतर काहीही करू शकता.जिंद येथील नसीब हे कृषी विभागात सरकारी नोकरीत आहेत. ज्या मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते तीही शिक्षण विभागात कार्यरत आहे. दोघेही सरकारी नोकरीवर आहेत. कोमलचे वडील एनडीआरआयमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी पालनपोषण करून आपल्या मुलीचे संगोपन केले आहे. संगोपन, शिक्षण देऊन मोठं केल्यानंतर आता करनालमध्ये तिचे  लग्न होणार होते. मुळात मुलीचे लोक यूपीचे आहेत. जेव्हा संबंध जुळले तेव्हा कोणत्याही प्रकारची मागणी करण्यात आली नाही, असा आरोप आहे.मुलीच्या वडिलांनी सांगितले की, वरात आल्यानंतर विवाह सोहळा होतो. मुलीच्या वडिलांनी वराचे वडील यांना अंगठी आणि वराला सोनसाखळी घातली. ही लग्नातील चालीरीती आटोपल्यानंतर वर तेथून उठला आणि लगेचचगळ्यातील साखळी ओढून फेकून दिली. आम्ही त्याला हात जोडून विनंती करू लागलो तेव्हा कळलं की त्या मुलाच्या नातेवाईकाला आणि दुसऱ्या भावाची सोनसाखळीही हवी होती. आम्ही दोन दिवसाचा अवधी मागितला.नकार देत त्याने शिवीगाळ करत सातफेरे घेण्यास नकार दिला. 20 लाख आणि फॉर्च्युनर कारची मागणी करण्यात आली. आम्ही वराला बोलवत राहिलो आणि तो आम्हाला टाळत राहिला. माझी मुलगी LLB, LLM, Ph.D आहे. ती नोकरी करते. एखाद्याच्या मुलीला असे सोडून गेल्यावर बापाने काय करावे?मंगळवारी सकाळपर्यंत नकार सुरूच होता. वरपक्षाची ही वागणूक न पटल्याने वधूपक्षाने पोलिसांना पाचारण करण्यात आले. मुलीच्या आईने सांगितले की, तिने मुलाकडच्या लोकांचे पाय पकडले. ते मान्य करायला कोणी तयार नव्हते. जावई गाडीची मागणी करत होता. वराचा भावोजी दिल्ली पोलिसात काम करतो. तो येत आहे आणि म्हणत आहे की, तू फॉर्च्युनर मागितली आहेस तर तू आता मागे का फिरतो आहेस.

पोलिसांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांच्याकडे कार, पैसे आणि दागिन्यांची मागणी केल्याचा आरोप वधू पक्ष करत आहेत. त्याचवेळी मुलाने हुंडा घेण्यास नकार दिल्याचे सांगितले. त्याने सोनसाखळी काढली आणि १० दिवसांनी देण्यास सांगितले. त्यांच्या घरात भांडण होणार नाही. यावरून त्यांच्यात भांडण सुरु झाले. कुटुंबीयांनी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल.

टॅग्स :dowryहुंडाPoliceपोलिसHaryanaहरयाणाmarriageलग्न