शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

एटीएसच्या कारवाईविरोधात आणि आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 19:51 IST

वैभव निर्दोष असल्याचा मोर्च्यात दावा 

नालासोपारा -  स्फोटकं सापडल्या प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी नालासोपाऱ्यात निषेध मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्च्यात सामील झाले होते. वैभवला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

नालासोपारा येथे राहणारा हिंदुत्वादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरात राज्य दहशतवाद विरोधी पथकाला मोठ्या प्रमाणात बॉम्ब, बॉम्ब बनविण्याचे सामान आणि शस्त्रास्त्रे सापडली होती. त्याला अटक केल्यानंतर नालासोपाऱ्यातील हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या आणि वैभव राऊतला विनाकारण या प्रकरणात गोवले गेल्याचा आरोप करण्यात आला. वैभव राऊत हा भंडारी समाजाचा असल्याने भंडारी समाजाने आज मोर्च्याची हाक दिली होती. आज संध्याकाळी साडेचार वाजता वैभव राऊत रहात असलेल्या भंडार आळीतून हा मोर्चा निघाला. या मोर्च्यात वसई विरारसहपालघर जिल्ह्यातील भंडारी समाजातले नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. त्यात महिला आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती. नालासोपारा बस आगारावरील रस्त्यावर मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. वैभव राऊतच्या पत्नीने हा कट असल्याचा आरोप केला. यावेळी 'देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो', 'जय श्रीराम' च्या घोषणा देण्यात आल्या. मै भी वैभव राऊत असे फलक लावण्यात आले होते. वैभव राऊत याला फसविण्यात आले असून शेवटपर्यंत त्याला साथ देणार असल्याची घोषणा यावेळी कऱण्यात आली. या मोर्च्यात ५ हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते. मोर्चा संध्याकाळी पाच वाजता निघणार होता. मात्र नंतर पोलिसांनी लवकर मोर्चा काढण्यास सांगितले होते. शिवसेना, आगरी सेनेने मोर्च्याला पाठिंबा दिला. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अभूतपुर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोपार गावापासून रेल्वे स्थानक परिसरात जागोजागी पोलीस तैनात कऱण्यात आले होते.

टॅग्स :Crimeगुन्हाVasai Virarवसई विरारpalgharपालघरAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकMorchaमोर्चा