मानोरा : मालमत्तेचा ‘आठ-अ’ देण्यासाठी आठ हजार रुपयाची लाच स्विकारताना मानोरा तालुक्यातील तळप बु. येथील ग्रामसेवक बालाजी भगवान सोनटक्के याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ६ जानेवारी रोजी पंचायत समिती आवारात रंगेहात पकडले.मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाºया तळप बु. येथील तक्रारदाराने वडीलोपार्जित मालमत्तेचा आठ अ बनवून देण्याची मागणी ग्रामसेवक बालाजी सोनटक्के याच्याकडे केली होती. आठ अ बनवून देण्यासाठी आठ हजार रुपयाच्या लाचेची मागणी ग्रामसेवकाने केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ५ जानेवारी रोजी तक्रार केली. या तक्रारीनुसार पाच जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मानोरा पंचायत समिती आवारात सापळा रचला असता, आरोपीने तक्रारदाराकडून आठ हजार रुपये स्विकारताच पथकाने आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले. आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आली. ही कारवाई वाशिम लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक एन. बी. बोराडे, पोलीस कर्मचारी आसिफ शेख, नितीन तवलाकर, अरविंद राठोड, सुनील मुंदे, वाजिद शेख यांनी केली.
आठ हजार रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 19:03 IST
ACB Trap: बालाजी भगवान सोनटक्के याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ६ जानेवारी रोजी पंचायत समिती आवारात रंगेहात पकडले.
आठ हजार रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवकास अटक
ठळक मुद्देआठ अ बनवून देण्यासाठी आठ हजार रुपयाच्या लाचेची मागणी ग्रामसेवकाने केली.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ५ जानेवारी रोजी तक्रार केली. आठ हजार रुपये स्विकारताच पथकाने आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले.