शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडचं तिकीटही मिळालं; मुंबईच्या विमानतळावरही पोहोचले अन् फसले!

By दत्ता यादव | Updated: February 4, 2024 15:32 IST

साताऱ्यातील चार तरुणांची कहाणी; शिक्षित असतानाही फसल्याचे मनात शल्य

सातारा : थायलंडचं तिकीटही मिळालं. ट्रिपला जाण्याच्या आनंदात चार मित्र साताऱ्यातून मुंबईच्या विमानतळावर पोहोचले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिक्षित असतानाही आपली फसगत झाल्याचे शल्य त्यांना सतावतेय. सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्तीने थायलंड ट्रिपचे तिकीट देतो, असे सांगून साताऱ्यातील चार तरुणांना तब्बल ३ लाख २५ हजारांचा गंडा घातलाय. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूपिंदर सिंग (रा. बलदेवनगर, अंबाला सिटी, हरयाणा), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील ३३ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावरील एका साईटवरून मोबाइल खरेदी केला. त्यावेळी भूपिंदर सिंग या नावाच्या व्यक्तीशी त्या तरुणाशी ओळख झाली. या ओळखीतून त्यांचे संभाषण वाढले. थायलंड फुकेत येथे ट्रिपला जाण्यासाठी तुम्हाला तिकीट देतो, असा विश्वास सिंगने संपादन केला. आम्ही चार मित्र असून, या चाैघांचे मिळून पैसे पाठवतो, असे साताऱ्यातील त्या तरुणाने त्याला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून साताऱ्यातील तरुणाने भूपिंदर सिंग याच्या कोटक महिंद्रा बॅंकेच्या अकाउंटवर वेळोवेळी ३ लाख २५ हजार रुपये पाठविले. 

काही दिवसांनंतर ईमेल आयडीवर सिंग याने फुकेत थायलंडचे तिकीट पाठवले. ठरल्याप्रमाणे चार मित्र थायलंडला जाण्यासाठी साताऱ्यातून मुंबईला रवाना झाले. मुंबईतील विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना तिकीट बुक नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सिंग याला फोन करून सांगितले. तेव्हा त्याने थोडा प्रॉब्लेम झाला असून, दोन दिवस थांबा दुसरे तिकीट पाठवतो, असे सांगितले. सिंगचे ऐकून हे चार मित्र मुंबईत दोन दिवस थांबले. मात्र, सिंगचा ना फोन ना कसलाही संपर्क पुन्हा झालाच नाही. उलट त्याने साताऱ्यातील या चौघा मित्रांचे नंबर ब्लॉकलिस्टला टाकले. 

तेव्हा या चौघांच्या पायाखालची वाळू सरकली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सर्वजण नाराज झाले. थायलंडच्या ट्रिपसाठी आनंदात विमानतळावर गेलेले चार मित्र हिरमसुल्या चेहऱ्याने पुन्हा साताऱ्यात आले. आपण शिक्षित आहोत, असे असतानाही आपण फसलो गेलो, याचे शल्य त्यांच्या मनात आहे. परंतु इतर कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाचा हवालदार राहुल गायकवाड हे पुढील तपास करतायत.

तिकीट खरं पण तरीसुद्धा..भूपिंदर सिंग याने पाठवलेले विमानाचे तिकीट खरे होते. त्यामुळे या चार मित्रांना त्याच्यावर विश्वास बसला. परंतु मुंबईला जाईपर्यंत त्यांचे तिकीट त्याने रद्द करून वेगळाच डाव खेळला. यामध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा आता पोलिस तपास करत आहेत.  

टॅग्स :ThailandथायलंडCrime Newsगुन्हेगारी