शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुडविन ज्वेलर्स प्रकरण : दोन भावांविरोधात लूकआउट नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 13:52 IST

६९ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

ठळक मुद्देसुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोन दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.अंबरनाथमध्ये ४०० ते ५०० ग्राहकांचे  गुडविन ज्वेलर्सच्या भिशीत अडकलेअंबरनाथमध्ये ४५ ग्राहकांच्या तक्रारीवरून गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि व्यवस्थापकाविरोधात 2 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा

डोंबिवली - गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी आतापर्यंत ६९ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जादा व्याजदर देण्याचे प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ३ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. तपासकामी एक पोलीस पथकही गठित करण्यात आले आहे.डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात गुडविन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात गुंतवणूक केल्यास १६ टक्के व्याजदर मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी लाखोंची गुंतवणूक केली होती. मात्र, दिवाळीच्या तोंडावर ज्वेलर्सचे दुकान बंद राहील्याने चर्चेला तोंड फुटले. आणि, समाज माध्यमांवरही ज्वेलर्सचा मालक आपले सामान घेऊन पसार झाल्याचा संदेश फिरण्यास सुरुवात झाली. दोन दिवस वाट पाहूनही दुकान उघडण्यात आले नसल्याने अखेर गुंतवणुकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सदरचा तक्रार अर्ज दाखल होताच पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे दुकान सील करीत सुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोन दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथमध्ये गुडविन ज्वेलर्सचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात ग्राहकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथमधील गुडविन ज्वेलर्स दुकानात मासिक भिशीच्या नावावर अनेक ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये ४५ ग्राहकांच्या तक्रारीवरून गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि व्यवस्थापकाविरोधात 2 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये ४०० ते ५०० ग्राहकांचे  गुडविन ज्वेलर्सच्या भिशीत अडकले असून त्यांच्या तक्रारी आल्यावर त्याची देखील नोंद घेतली जाईल असे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीdombivaliडोंबिवलीambernathअंबरनाथPoliceपोलिस