शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

तस्करीचे रॅकेट डीआरआयकडून उध्द्वस्त; कोलकाता, रायपूर व मुंबईत ४२ किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 21:45 IST

याप्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देमालविय, मुल्ला, अण्णा राम, महेंद्र कुमार, सुरज मगाबुल, कैलाश जगताप, विशाल माने या सात आरोपींना अटक करण्यात आली.यावेळी गोपराम व मिलन कुमार, साहिल जैन या आरोपींना अटक करण्यात आली.या आर्थिक वर्षात डीआरआयने पूर्व विभागात सुमारे २१९ किलो सोने जप्त केले आहे.

मुंबई - महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) केलेल्या धडक कारवाईत देशातील सोने तस्करीचे मोठे जाळे उध्द्वस्त करत ४२ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत १६ कोटी ५० लाख रुपये आहे. कोलकाता, रायपूर व मुंबईत कारवाई करत डीआरआयने सोने तस्करांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

दोन दिवसांपासून डीआरआयचे अधिकारी, कर्मचारी या कारवाईमध्ये गुंतले होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. कोलकाता येथील गोविंद मालवीय, फिरोज मुल्ला या आरोपींच्या निवासस्थानावर धाड टाकल्यावर २६.६५० किलो सोने सापडले. हे सोने विदेशातून आणण्यात आले होते. ५५२.०३० ग्रॅम वजनाचे दागिने यावेळी सापडले. त्याची किंमत १० कोटी ५७ लाख होती. सीमाशुल्क कायदा १९६२ अन्वये हे सोने जप्त करण्यात आले.

मालविय, मुल्ला, अण्णा राम, महेंद्र कुमार, सुरज मगाबुल, कैलाश जगताप, विशाल माने या सात आरोपींना अटक करण्यात आली. त्यावेळी केलेल्या चौकशीत गोविंद मालवीय याने दोन पार्सल समरसत्ता एसएफ एक्सप्रेस (रायपूर) व एलटीटी कुर्ला एक्सप्रेसने मुंबईला पाठवल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये रायपूर येथे ८ किलो व मुंबईत ७ किलो सोने जप्त करण्यात आले. यावेळी गोपराम व मिलन कुमार, साहिल जैन या आरोपींना अटक करण्यात आली. या आर्थिक वर्षात डीआरआयने पूर्व विभागात सुमारे २१९ किलो सोने जप्त केले आहे.

टॅग्स :Directorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयGoldसोनंArrestअटकSmugglingतस्करी