शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! कारमधून नेत होते चक्क सोन्याची होडी; तस्करीचा फंडा पाहून पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:59 IST

पोलिसांनी ५ तरुणांना ठोकल्या बेड्या; अधिक तपास सुरू

प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सोने तस्करीची एक वेगळीच घटना समोर आली आहे. नाकाबंदी सुरू असताना उघडकीस आलेल्या या घटनेनं पोलीस चक्रावून गेले. काही व्यक्ती कारमधून चक्क सोन्याची होडी घेऊन प्रवास करत होते. या होडीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तस्करांना पकडण्यासाठी नाकाबंदी लावली. त्यात ५ जण अलगद सापडले. पोलिसांनी पकडलेली होडी जवळपास दीड किलोची आहे.

काही व्यक्ती कारमधून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मनोरी पासवर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी एका कारमध्ये पोलिसांना सोन्याची होडी दिसली. या प्रकरणी पोलिसांनी प्रयागराज आणि कौशांबीतील ५ तरुणांना अटक केली. तिलक सिंह (कौशांबी), सूरज वर्मा (प्रयागराज), धीरेंद्र पाल (कौशांबी), विमलेश कुमार (कौशांबी) आणि रामधन (प्रयागराज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

आसाममधून आणलेलं सोनं विकायला जात असल्याची माहिती आरोपींनी पोलीस चौकशीत दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे सोने खरेदीशी संबंधित कागदपत्रं मागितली. मात्र त्यांना कोणतीही कागदपत्रं दाखवता आली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी होडी ताब्यात घेतली आणि ५ जणांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला अहवाल पाठवला आहे. 

टॅग्स :Goldसोनं