शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचे दागिने चोरणारी महिला गजाआड; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:24 IST

या घरकाम करणाऱ्या तरुणीला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली.

ठळक मुद्देगोपाल काबरा यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. काबरा पती-पत्नी दोघेही इंजिनिअर पदावर नोकरी करत असल्याने घराबाहेर असतात.

 

डोंबिवली - ठाकुर्ली परिसरात राहणा-या इंजिनियरच्या घरातील ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन सदरचे दागिने सोन्याच्या दुकानात विकणाऱ्या उर्मिला जितेंद्र कदम (२६, रा.त्रिमूर्ती नगर, झोपडपट्टी) या घरकाम करणाऱ्या तरुणीला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली.ठाकुर्ली येथील मंगेशी डॅझल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या गोपाल काबरा यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. काबरा पती-पत्नी दोघेही इंजिनिअर पदावर नोकरी करत असल्याने घराबाहेर असतात. काबरा यांच्या घरातील ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. परंतु, त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कुलूप तथवा कडीकोयंडा तुटलेला नव्हता. या प्रकरणाचा तपास कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, नितीन मुदगुन यांच्यासह पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, अजित राजपूत, सतीश पगारे, हरिश्चंद्र बंगारा आणि चित्रा इरपाचे यांचे पथक चोरटयाचा शोध घेत होती. याच दरम्यान, सात-आठ महिन्यांपासून काबरा यांच्या घरी काम करणाऱ्या उर्मिला हिच्यावर पथकाला संशय आला. पथकाने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, काबरा यांच्या घरातून तीन महिन्यांपूर्वी एक चावी चोरल्याचे सांगत दोन महिन्यांपूर्वी घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरलेल्या चावीने घराचे कुलूप उघडून दागिने चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर चोरलेले दागिने गोग्रासवाडी रोडवर असलेल्या पूजा ज्वेलर्समध्ये विकून ५० हजार रुपये घेतल्याचे सांगितले.याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या उर्मिलावर कारवाई करत तिला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटकPoliceपोलिसkalyanकल्याण