शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरी करणारे सराईत चोरटे गजाआड, कल्याण गुन्हे अन्वेषणची कामगिरी

By प्रशांत माने | Updated: March 27, 2023 21:07 IST

तपासात सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यांच्याकडून सात तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा एकूण ५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कल्याण : एकिकडे सोनसाखळी चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असताना दुसरीकडे कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या गुन्ह्यातील चार सराईत चोरट्यांना सापळा लावून अटक केली. तपासात सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यांच्याकडून सात तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा एकूण ५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सलमान उर्फ राजकपुर असदल्ला इराणी (वय २३), हसन अजिज सय्यद (वय २४), सावर रजा सय्यद इराणी (वय ३५), मस्तानअली दुदानअली इराणी (वय ४६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी आंबिवली इराणी वस्तीतील राहणारे आहेत. सोनसाखळी चोरीच्या दाखल होणा-या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग समांतर तपास करीत आहे. या विभागातील पोलिस हवालदार प्रशांत वानखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहीती मिळाली की, ठाणे जिल्हयातील विविध शहरांमध्ये महिलांच्या गळयातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरी करणारे चोरटे तसेच नागरीकांना बतावणी करीत लुटणारे  बनेली टिटवाळा परिसरात येणार आहेत. या माहीतीच्या आधारे वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, बालाजी शिंदे, विश्वास माने, बापुराव जाधव, गोरखनाथ पोटे, विलास कडु, प्रविण बागुल, किशोर पाटील, रमाकांत पाटील, प्रविण जाधव, उल्हास खंडारे, अमोल बोरकर, महिला पोलिस हवालदार मेघा जाने, पोलिस नाईक श्रीधर हुंडेकरी, सचिन वानखेडे, पोलिस शिपाई गोरक्षनाथ शेकडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, उमेश जाधव, विनोद चन्ने, महिला पोलिस शिपाई मंगला गावित आदिंच्या पथकाने मिळालेल्या माहीतीप्रमाणो बनेली परिसरात सापळा लावून चौघा सराईत चोरटयांना पकडले. अटक आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांनी कल्याण महात्मा फुले चौक पोलिस ठाणे अंतर्गत २, बाजारपेठ पोलिस ठाणे आणि डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी १ तर ठाण्यातील कापुरबावडी आणि राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी १ असे सहा गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक शिरसाठ यांनी दिली. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण